आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 11 May LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India 11 May 2020

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:रुग्णांचा आकडा 69 हजार 149 वर: आयसीएमआर निवडक जिल्ह्यांचा सर्व्हे करेल, यावेळी स्वाब सँपलसोबत एलिसा कीटने अँटीबॉडी टेस्टदेखील होईल

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊमध्ये ट्रकमधून मजूर आपल्या गावी जाताना, क्वारंटाइन आणि कागदोपत्री कारवाई टाळण्यसााठी, बरेच मजूर कामगार विशेष गाड्यांमधून जात नाहीत. - Divya Marathi
लखनऊमध्ये ट्रकमधून मजूर आपल्या गावी जाताना, क्वारंटाइन आणि कागदोपत्री कारवाई टाळण्यसााठी, बरेच मजूर कामगार विशेष गाड्यांमधून जात नाहीत.
  • जीसीसी बायोटेक म्हणाले - दररोज 3 लाख चाचणी किट बनवून सरकारला देऊ शकतो
  • नवीन गाइडलाइन - सौम्य लक्षणे असणार्‍या रुग्णांचा होम आयसोलेशन 17 दिवसांत संपेल, .
  • केंद्र म्हणाले - देशात 4362 कोविड सेंटर, सौम्य लक्षणे असलेले साडेचार लाख रुग्णांची क्षमता

देशात कोरोना संक्रमितांचा आकडा की69 हजार 149 झाला आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संक्रमणाची माहिती गोळा करण्यासाठी निवडक जिल्ह्यांचा सर्व्हे करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयने सोमवारी सांगितले की, यादरम्यान आरटी-पीसीआर टेस्टसाठी स्बाव सँपलसोबतच एलिसा कीटने रक्तातील अँटीबॉडी टेस्टदेखील केली जाईल.

सोमवारी तमिळनाडुमध्ये 798, गुजरात 347, दिल्ली 310, मध्यप्रदेश 171, राजस्थान 126, पंजाब 54, आंध्रप्रदेश 38, ओडिशा 17 आणि बिहारमध्ये 26 रुग्ण सापडले. याआधी देशात रविवारी सर्वाधिक 4296 रुग्ण सापडले होते. तसेच सर्वाधिक 1668 रुग्ण बरे झाले होते. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 67 हजार 152 संक्रमित आहेत. 44 हजार 29 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 20 हजार 916 बरे झाले तर 2206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात असलेली जीसीसी बायोटेक इंडिया या खासगी कंपनीने कोरोना चाचणीसाठी रिअल-टाइम चाचणी किट तयार केल्याचा दावा केला आहे. कंपनीचे एमडी राजा मजूमदार यांचे म्हणणे आहे की एक कोटी चाचणी किट तयार केली गेली आहे. देशात दररोज 3 लाख चाचण्या होत असतील तरीही ते कोणत्याही अडचणीशिवाय इतके किट बनवू शकतात. एका किटची किंमत फक्त 500 रुपये आहे. मजूमदार म्हणाले की, त्यांना 1 मे रोजी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (आयसीएमआर) मान्यता मिळाली होती.  

कोरोना अपडेट्स

> आरोग्य मंत्रालयाने कोरोनाचे अति सौम्य लक्षणे किंवा प्री-सिम्पटोमॅटिक रुग्णांसाठी होम > आयसोलेशनच्या गाइडलाइन्समध्ये बदल केले आहेत. होम आयसोलेशनवाले रुग्ण सुरुवातीचे लक्षण दिसल्याच्या 17 दिवसांनंतर तर प्री-सिम्पटोमॅटिक प्रकरणांमध्ये नमुना घेण्याच्या 17 दिवसांनंतर होम क्वारंटाइऩ संपेल. दोन्ही प्रकरणांमध्ये एक अट आहे, ती म्हणजे रुग्णाला 10 दिवसांपासून ताप नसावा. या रुग्णांना तीन लेयरचा मास्क परिधान करणे आणि 8 तासाला बदलणे बंधनकारक आहे. 

> दिल्लीत ऊर्जा मंत्रालयातील एका अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर श्रम शक्ती भवनचा सहावा मजला सील करण्यात आला. या मजल्यावर ऊर्जा मंत्रालयाचे कार्यालय आहे. मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये ही माहिती देण्यात आली. मंगळवारपासून कार्यालयाचे कामकाज सुरू होईल, असे त्यात म्हटले आहे.

> बिहारमध्ये 15 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे.

बातम्या आणखी आहेत...