आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 12 June LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाखांच्या पुढे, एकट्या महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त संक्रमित

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो दिल्लीतील कस्तूरबा गांधी रुग्णालयाचे आहे. वेतन न दिल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांनी मूक आंदोलन केले - Divya Marathi
हा फोटो दिल्लीतील कस्तूरबा गांधी रुग्णालयाचे आहे. वेतन न दिल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांनी मूक आंदोलन केले
  • देशात कोरोनामुळे आतापर्यंत 8 हजार 502 मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक 3,590 संक्रमितांचा मृत्यू

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 3 लाखांच्या पुढे गेला आहे. यातील 33% पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रात 3 हजार 493 नवीन संक्रमित मिळाले आहेत. यासोबतच राज्यातील संक्रमितांचा एकूण आकडा 1 लाख 1 हजार 141झाला आहे. यातील अर्ध्यापेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. तिकडे, गुजरातमध्ये कोरोनाचा मृत्यूदर 9.16% झाला आहे. अहमदाबादमध्ये मृत्युदर 10.27% आहे. राज्यात आतापर्यंत 15 हजार 635 रुग्ण सापडले आहेत. तर, एकूण 1 हजार 385 मृत्यू झाले. यातील 1 हजार 117 (81%) चा मृत्यू एकट्या अहमदाबादमध्ये झाला.

पंजाब आणि मध्य प्रदेश सरकारने लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारने सांगितले की, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी राज्यातील सर्व दुकाने, बाजार, बंद राहतील आणि लोकांच्या घरातून बाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी राहील. 

मध्यप्रदेश सरकारने भोपाळमध्ये आठवड्यातील पाच दिवस संपूर्ण शहर सुरू करण्याचा निर्णय घेतला. शनिवार आणि रविवार दोन दिवस अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता शहर पूर्णपणे बंद राहील. परंतु हे नियम लागू करण्याची तारीख अद्याप ठरलेली नाही. जिल्हाधिकारी तरुण पिथोड़ यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आदेश जारी केला जाईल. 

गुरुवारी महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्ण आढळले

covid19india.org नुसार, गुरुवारी महाराष्ट्र आणि दिल्लीत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळले. महाराष्ट्रात 3607 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि 152 मृत्यू झाले. तर दिल्लीत 1877 रुग्ण आढळले आणि 101 जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत आतपर्यंत कोरोनामुळे 1085 जणांचा बळी गेला आहे. 

कोरोना अपडेट्स 

आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी कोरोनावर आपली आकडेवारी जारी केली. यानुसार, गुरुवारी 10 हजार 956 रुग्ण आढळले. तर मागील 24 तासांत 396 मृत्यू झाले. यासोबत देशात आतापर्यंत 2 लाख 97 हजार 535 प्रकरणे समोर आली आहेत. यातील 1 लाख 41 हजार 842 अॅक्टीव्ह केसेस असून 1 लाख 47 हजार 195 रुग्ण बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 8498 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...