आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 12 May 2020 LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:रुग्णांचा आकडा 73 हजार 981 वर: आरोग्य मंत्री म्हणाले- रिकव्हरी रेट वाढून 31.7% वर; जगाच्या तुलनेत डेथ रेट सर्वात कमी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हे चित्र दिल्लीचे आहे. हे मजूर कुटुंब उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे पायी जात आहे. उन्हात एक आई आपल्या मुलाला पाणी पाजताना - Divya Marathi
हे चित्र दिल्लीचे आहे. हे मजूर कुटुंब उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे पायी जात आहे. उन्हात एक आई आपल्या मुलाला पाणी पाजताना
  • आरोग्य सेतुमुळे 697 संभाव्य हॉट स्पॉटची माहिती मिळाली
  • देशात काल दिवसभरात आढळले 3589 नवे रुग्ण

देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 71 हजार 474 झाली आहे. आज महाराष्ट्रात 1026, तमिळनाडुमध्ये 716, दिल्ली 406, गुजरात 362, मध्यप्रदेश 201, बिहार 81, राजस्थान  68 आणि प. बंगालमध्ये 110 रुग्णांसह देशभरात 3200 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्या आहेत. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 70 हजार 756 कोरोनाग्रस्त आहेत. 46 हजार 8 जणांवर उपचार सुरु असून 22 हजार 454 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना बाधितांचा रिकव्हरी रेट दररोज वाढत आहे. आज देशातील रिकव्हरी रेट 31.7% आहे. तसेच, जगाच्या तुलनेत भारताचा डेथ रेट सर्वात कमी 3.2% आहे.  

पंतप्रधानांनी मानले सर्व नर्सचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिचारिका दिवसानिमित्त ट्विट करत या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. मोदींनी लिहिले की, आंतरराष्ट्रीय नर्स डे त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करण्याचा विशेष दिवस आहे. ते आपला ग्रह वाचवण्यासाठी चोवीस तास काम करतात. यावेळी ते कोविड-19 ला हरवण्यासाठी कठीण परिश्रम घेत आहेत. आम्ही नर्स आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभारी आहोत.

कोरोनाच्या लढाईत आरोग्य सेतु अॅप फायदेशीर ठरत आहे. यामुळे देशभरातील 697 संभाव्य हॉट स्पॉट बद्दल माहिती मिळाली. आतापर्यंत 9.8 कोटी लोकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. ब्लूटूथ कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून 1.4 लाख वापरकर्त्यांना संसर्गाच्या धोक्याबद्दल सतर्क केले गेले. त्यांचा संसर्ग झालेल्या लोकांच्या संपर्कात येण्याची भीती आहे. एम्पावर्ड ग्रुप 9 चे अध्यक्ष अजय सहनी यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर लॉकडाउननंतरही हे प्रवासी हवाई प्रवाश्यांसाठी हे अॅप अनिवार्य करू शकते.

बातम्या आणखी आहेत...