आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 71.22 लाखांच्या पुढे गेला आहे. रविवारी 67 हजार 789 नवीन रुग्ण समोर आले, तर 71 हजार 564 रुग्ण ठीक झाले. वाईट बातमी म्हणजे, काल 813 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वात जास्त 309 संक्रमित एकट्या महाराष्ट्रातील आहेत. यानंतर कर्नाटक 75, तमिळनाडूत 65 रुग्णांनी जीव गमावला.
दिलासादायक बाब म्हणजे यातील 61 लाख 45 हजार 58 लोक बरे होऊन घरी परतले. देशात सध्या 8 लाख 62 हजार 662 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 9 हजार 163 जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे covid19india.org नुसार आहेत.
सणासुदीत कोरोनापासून बचावाची काळजी घ्या : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन
देशात कोरोना लसीच्या वितरणाबाबत आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, ज्येष्ठांऐवजी तरुणांना आधी लस उपलब्ध करून देण्याची सरकारची योजना नाही. संडे संवाद कार्यक्रमात डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी सांगितले की, लसीसाठी आपत्कालीन प्राधान्य देण्याबाबत सरकारने अद्याप विचार केलेला नाही. त्याआधी लोकांच्या सुरक्षेसाठी लसीच्या चाचणीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय डाटाची प्रतीक्षा आहे. संसर्गाची जोखीम असणाऱ्या समूहाला प्राधान्य देण्यात येईल.
डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोना लसीचा मर्यादित स्वरूपातच पुरवठा होईल, अशी भीती आहे. भारतासारख्या मोठ्या देशात प्राधान्यक्रमानुसारच लसीकरणाची तयारी आवश्यक आहे. जेव्हा गरज भासेल तेव्हा अडचणी येऊ नयेत म्हणून अनेक गोष्टींची तयारी केली जात आहे. तसेच आगामी सणासुदीत आणि धार्मिक उत्सवाबाबत लोकांना सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला.
पुन्हा संसर्गाच्या प्रकरणांचे चुकीचे वर्गीकरण झाले
मंत्र्यांनी सांगितले की, खरी प्रकरणे आणि चुकीच्या प्रकरणात फरक करणे आवश्यक आहे. राज्यांमध्ये एखाद्यास दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याच्या तुरळक घटना घडल्या. मात्र आयसीएमआर डाटाबेसच्या विश्लेषणातून दिसते की, यातील अनेक प्रकरणांना वास्तवात पुन्हा संसर्ग म्हणून चुकीच्या पद्धतीने वर्गीकृत करण्यात आले. कोरोना निदान मुख्यत्वे आरटीपीसीआरने केले जाते. यात मृत विषाणूही दिसतात. रुग्ण बाधित नसतानाही हा मृत विषाणू शरीरात काही आठवडे किंवा महिन्यांपर्यंत राहू शकतो.
फेलुदा चाचणी प्रभावी, ड्रग नियामकाने दिली मंजुरी
फेलुदा चाचणीच्या वापराबाबत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, 200 रुग्णांवर त्याची चाचणी झाली आहे. ती स्वदेशी सीआरआयएसपीआय जीन- एडिटिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. तिच्या वापराची मंजुरी डीसीजीए आधीच दिली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.