आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 13 June News AnduUpdates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India 13 June

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:देशात आतापर्यंत 3.17 लाख प्रकरणे; मोदींनी मंत्र्यांसह कोरोना संक्रमणास सामोरे जाण्याच्या तयारीचा घेतला आढावा

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • देशात कोरोनामुळे आतापर्यंत 8890 मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक 3717 जणांचा बळी गेला

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 17 हजार 236 झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत संसर्ग रोखण्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र आणि दिल्लीसह सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या परिस्थितीवर चर्चा झाली. मोदी 16 आणि 17 जून रोजी सहाव्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही करणार आहेत. 

बैठकीनंतर पीएमओने सांगितले की देशातील 5 राज्यात दोन तृतीयांश कोरोना प्रकरणे आहेत. मोठ्या शहरांमध्ये अधिक संक्रमण पसरत आहे. येथील कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी वाढती चाचणी, बेडची संख्या आणि आवश्यक सेवा यावर चर्चा झाली. या व्यतिरिक्त, पंतप्रधानांनी आरोग्य मंत्रालयाला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमधील बेड आणि कोरोना वॉर्डच्या आवश्यकतेबाबत राज्यांसह आपत्कालीन नियोजन करण्यास सांगितले आहे.         पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव, आयसीएमआरचे संचालक आणि सशक्त गटातील सदस्यांनी हजेरी लावली. यानंतर रविवारी गृहमंत्री शहा आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची भेट एलजी अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्याशी होईल. दिल्लीत संक्रमितांची संख्या 36 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. 

देशात शुक्रवारी 7259 रुग्ण बरे झाले, 14 दिवसानंतर दुसरा मोठा आकडा 

देशात बरे होण्याऱ्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी 7259 रुग्ण बरे झाले. याआधी 29 मे रोजी सर्वाधिक 11 हजार 736 रुग्ण बरे झाले होते. पश्चिम बंगाल 10 हजार रुग्णसंख्या असलेले 8 वे राज्य बनले आहे. तमिळनाडूत रुग्णसंख्या 40 हजार पार झाली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी आपली आकडेवारी झाली केली. यानुसार, मागील 24 तासांत 11 हजार 458 रुग्ण आढळले. तर 386 लोकांचा मृत्यू झाला. देशभरातील एकूण रुग्णसंख्या 3 लाख 8 हजार 993 झाली. यातील 1 लाख 45 हजार 779 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 1 लाख 54 हजार 330 लोक बरे झाले आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 8884 लोकांचा मृत्य झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...