आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 14 June LIVE News And Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:देशात सध्या 3.24 लाख संक्रमित; लॉकडाउनमुळे भारतात कोरोनाचा पीक नोव्हेंबरमध्ये शिफ्ट झाला, तेव्हा आयसीयू बेड-व्हेंटिलेटरची कमतरता भासण्याची शक्यता

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो लखनऊचा आहे. येथील सरकारी कार्यालयाबाहेर एक कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. तो प्रत्येक येणाऱ्याला सॅनिटायजर देत आहे. - Divya Marathi
हा फोटो लखनऊचा आहे. येथील सरकारी कार्यालयाबाहेर एक कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. तो प्रत्येक येणाऱ्याला सॅनिटायजर देत आहे.
  • देशात कोरोनामुळे आतापर्यंत 9199 मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक 3830 लोकांचा गेला बळी

देशात कोरोना संक्रमितांचा आकडा 3 लाख 24 हजार 559 झाला आहे. हे आकडे covid19india.org नुसार आहेत. आयसीएमआरच्या ऑपरेशंस रिसर्च ग्रुपच्या अभ्यासानुसार, लॉकडाउनमुळे देशातील कोरोनाचा पीक टाइम 34 ते 76 दिवसांवर शिफ्ट झाला. आता पीक नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे. तेव्हा आयसीयू बेड-व्हेंटिलेटरची कमकरता भासण्याची शक्यता आहे. अभ्यासात सांगण्यात आले आहे की, लॉकडाउनमुळे 69 ते 97% पर्यंत संक्रमणात कमतरता आली. त्यामुळे आता आपल्याकडे पीकपासून हेल्थकेअर सिस्टीमला मजबुत करण्याची वेळ आहे.

तिकडे, केंद्रीय गृह मंत्री अमित शाहंनी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसोबत राजधानीत कोरोनाच्या परिस्थितीवर बैठक घेतली. यानंतर शाह म्हणाले की, बेडची कमतरता पाहता केंद्र सरकार दिल्लीला ट्रेन्सचे 500 कोच उपलब्ध करुन देईल. यांना आयसोलेशन वार्डत बदलण्यात आले आहे. यामुळे 8.000 बेड्स उपलब्ध होतील.

याशिवाय, दिल्लीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने 20 हजार बेड जोडण्याची योजना तयार केली आहे. यासाठी नर्सिंग होम, हॉटेल आणि बँक्वेट हॉलचा वापर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान हॉटेल आणि बँक्वेट हॉलमध्ये सुमारे 15 हजार बेड तयार करण्यात येणार आहे.

यापूर्वी शनिवारी केजरीवाल सरकारने 10 ते 49 बेडची क्षमता असलेले सर्व मल्टीस्पेशलिटी नर्सिंग होमला कोविड-19 नर्सिंग रुग्णालय घोषित केले. सरकारनुसार, असे सर्व नर्सिंग होमने 3 दिवसांत कोविड रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी स्वतःला तयार करावे लागेल. असे न केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. यावर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रविवारी सकाळी ट्वीट केले की, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे 5 हजारपेक्षा अधिक बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध होतील. काही दिवसांत आमचे अधिकारी नर्सिंगहोमचे मालकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी दूर करतील. 

बातम्या आणखी आहेत...