आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 14 May 2020 LIVE Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:रुग्णांचा आकडा 79 हजार 344 वर: संक्रमितांची संख्या 12 दिवसात आणि ठीक होणाऱ्यांची संख्या 10 दिवसात दुप्पट होत आहे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो अहमदाबादचा आहे. उत्तर प्रदेशातील मजुर आपल्या राज्यात जाण्यासाठी वाहनांची वाट पाहत आहेत. - Divya Marathi
फोटो अहमदाबादचा आहे. उत्तर प्रदेशातील मजुर आपल्या राज्यात जाण्यासाठी वाहनांची वाट पाहत आहेत.
  • कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान कॅरेस फंडमधून 3100 कोटी रुपये जाहीर

देशात आता दररोज अंदाजे 4000 कोरोना संक्रमित वाढत असून रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग 12 दिवसांवर आला आहे. तर या आजारापासून मुक्त होणाऱ्यांची संख्या 10 दिवसात दुप्पट होत आहे. 2 मे रोजी देशात 39 हजार 826 संक्रमित होते. 14 मे रोजी हा आकडा 78 हजार 823 झाला आहे. याप्रकारे 3 मे रोजी 911 रुग्ण ठीक झाले होते, 13 मे रोजी 1946 रुग्ण ठीक झाले आहेत. देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 79 हजार 344 झाला आहे. गुरुवारी महाराष्ट्रात 1602, दिल्ली 472, ओडिशा 73, आंध्रप्रदेश 68, राजस्थान 66, कर्नाटक 22, हरियाणा 14, बिहार 13, असम 7, झारखंड 4, तर उत्तराखंडमध्ये 3 रुग्ण सापडले. आज 92 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील एकूण मृतांचा आकडा 2644 झाला आहे.

बुधवारी 3725 नवीन रुग्ण आढळले. महाराष्ट्रात सलग पाचव्या दिवशी एक हजारापेक्षा जास्त (1495) रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दुसरीकडे 24 तासांत सर्वाधिक 1946 रुग्ण बरे झाले. याआधी मंगळवारी एका दिवसात 1905 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. 

रेल्वेने 30 जूनपर्यंत आरक्षित रेल्वेची तिकिटे रद्द केली आहेत. मात्र श्रमिक स्पेशल आणि इतर विशेष रेल्वे गाड्या सुरू राहणार आहेत. या निर्णयावरून 30 जूनपर्यंत रेल्वेच्या सामान्य गाड्या पूर्ववत होणार नाही, असे मानले जात आहे. सहसा 120 दिवस अगोदर रेल्वेचे तिकीट आरक्षित करता येते. अशा परिस्थितीत लॉकडाउनपूर्वी बरीच तिकिटे बुक केली होती. 

अपडेट...

दिल्लीच्या गाजीपूर फळ आणि भाजीमंडईत सचिव आणि उप-सचिव कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यानंतर ही मंडई दोन दिवसांसाठी बंद केली होती. यादरम्यान येथे सॅनिटायजेशन करण्यात येणार आहे. 

माजी केंद्रीय मंत्री आणि कर्नाटक काँग्रेसचे एमएलसी सीएम इब्राहिम यांनी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना पत्र पाठवले. डॉक्टरांच्या सल्ल्या नंतर राज्यातील मुस्लिमांना ईदच्या दिवशी ईदगाह किंवा मशिदीत नमाज पठण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...