आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 15 May 2020 LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:संक्रमितांचा आकडा 85 हजार 546 वर: देशातील रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढून 34.06% वर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी 145 श्रमिक स्पेशल गाड्या धावल्या, यातून 2 लाख मजुरांनी केला प्रवास - रेल्वेने दिली माहिती

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 83 हजार 48 झाला आहे. शुक्रवारी कोरोना संकटाबाबत मंत्री मंडळाची 15वी बैठक पार पडली. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, मागील 24 तासात 1685 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे देशातील रिकव्हरी रेट वाढून 34.06% झाला आहे. 

हर्षवर्धन यांनी सांगितल्यानुसार, आतापर्यंत आढळलेल्या कोरोना संक्रमितांपैकी 79% देशातील 30 शहरांमध्ये आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी 18 हजार 855 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने 84.22 लाख N95 मास्क आणि 47.98 लाख पीपीई राज्यांना दिल्या आहेत. देशात आता रोज 3 लाख पीपीई आणि N-95 मास्क बनवले जात आहेत.

शुक्रवारी महाराष्ट्रात 1576, तमिळनाडूमध्ये 434, दिल्ली 425, गुजरात 340, राजस्थान 154, मध्यप्रदेश 169, आंध्रप्रदेश 102, प. बंगाल 84, बिहार 19, हरियाणा 36, जम्मू-कश्मीर 30, केरळमध्ये 16 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या. हे आकडे covid19india.org वेबसाइट आणि राज्य सरकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात 81 हजार 970 संक्रमित आहेत, तर  51 हजार 401 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. 27 हजार 920 ठीक झाले आहेत, तर 2649 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दोन आठवड्यांत 44 हजार 738 रुग्ण वाढले

देशात कोरोनाबाधितांची संख्या 82 बजार 166 झाली आहे. या महिन्यांच्या पहिल्या तारखेला देशात 37 हजार 262 कोरोना रुग्ण होते. यामध्ये मागील दोन आठवड्यांत 44 हजार 738 रुग्णांची वाढ झाली. गुरुवारी देशभरात 3943 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 81 हजार 970 कोरोनाबाधित आहेत. 51 हजार 401 रुग्णांवर उपचार सुरू असू  27 हजार 919 बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे 2649 लोकांचा मृत्यू झाला आहे.  

गृह मंत्रालय राज्यांना म्हणाले - स्थलांतरित मजुरांना स्टेशनवर पोहोचवण्यासाठी बस भाड्याने घेऊ शकतात

देशभरात प्रवासी मजुर आपल्या घराकडे परतत आहे. श्रमिक रेल्वे गाड्या वगळता प्रवासाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकापर्यंत आणि तेथून गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी त्यांना अडचणी येत आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना सांगितले की ते मजुरांच्या सोयीसाठी खासगी बस भाड्याने घेऊ शकतात. दरम्यान रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ममता बॅनर्जी यांना 30 दिवसांत 105 गाड्या चालविण्याऐवजी दररोज 105 गाड्या चालवण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून बंगालमधील कामगार घरी परतू शकतील.

कोरोना संक्रमणाचा प्रसार कमी झाला

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, गेल्या 3 दिवसांपासून कोरोनाचे प्रकरणे 13.9 दिवसांत दुप्पट होत आहेत. हाच कालावधी दोन आठवड्यांपूर्वी 11.1 दिवस होता. म्हणजेच, संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. 24 तासांत, 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोणतीही नवीन प्रकरणे नोंदली गेली नाहीत. त्यांनी सांगितले की आम्ही दररोज 1 लाख चाचण्या करण्याची क्षमता प्राप्त केली आहे. गुरुवारपर्यंत, देशभरातील 500 प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या 2 लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्र्यांनी COBAS 6800 मशीनचे लोकार्पण केले. याद्वारे एका दिवसात 1200 पीसीआर टेस्ट केली जातात. 

बातम्या आणखी आहेत...