आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 16 May 2020 LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:आतापर्यंत 88 हजार 506 कोरोनाग्रस्त : मिझोरमनंतर पंजाबने देखील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हे चित्र दिल्लीचे आहे. उत्तर प्रदेशच्या सीमेवर स्थलांतरित कामगार कुटुंबे आपल्या घराकडे जाण्यासाठी वाहनांची वाट पाहात आहेत - Divya Marathi
हे चित्र दिल्लीचे आहे. उत्तर प्रदेशच्या सीमेवर स्थलांतरित कामगार कुटुंबे आपल्या घराकडे जाण्यासाठी वाहनांची वाट पाहात आहेत
  • सरकार म्हणाले - संक्रमितांचा रिकव्हरी रेट 34.06%, दुप्पट दर वाढून 12.9 दिवसांचा झाला
  • केंद्र म्हणाले- प्रवासी कामगारांसाठी ट्रेन-बसची व्यवस्था करण्याची राज्यांची जबाबदारी

देशातील कोरोना बाधितांची संख्या 88 हजार 506 झाली आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाधिक 108 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामध्ये अनंतनाग येथील 12 गर्भवर्ती महिलांचा समावेश आहे. जम्मू-कश्मीरात आतापर्यंत 1098 रुग्ण झाले आहेत. याशिवाय गुजरातमध्ये 1057 तमिळनाडूत 477, दिल्लीत 438, राजस्थानात 177, पश्चिम बंगालमध्ये 115, बिहारमध्ये 112 आणि आंध्रप्रदेशात 48 नवीन रुग्ण आढळले. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात 85 हजार 940 कोरोनाग्रस्त आहेत. 53 हजार 35 जणांवर उपचार सुरू असून 30 हजार 153 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे 2752 लोकांचा मृत्यू झाला आहे.

मिझोरमनंतर पंजाबने देखील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबने लॉकडाउन 31 मेपर्यंत वाढवला. याआधी मिझोरमने देखील लॉकडाउन वाढवला आहे. शनिवारी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, पंजाब सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्रालयाने देशव्यापी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून ती 31 मेपर्यंत अंमलात आणण्याची सूचना केली आहे. ते म्हणाले की, पंजाबमधील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे, परंतु 18 मेपासून कर्फ्यू काढला जाईल. कंटेनमेंट झोनमध्ये प्रतिबंध लागू राहतील. 

15 मे पर्यंत धावल्या 1074 श्रमिक रेल्वे गाड्या, 14 लाख लोक स्वगृही परतले 

  रेल्वेने शनिवारी सांगितले की 15 मे रात्री 12 वाजेपर्यंत देशभरात 1074 मजुरांच्या विशेष गाड्या चालवल्या गेल्या आहेत. याद्वारे 14 लाख लोकांना त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये पायी किंवा खासगी वाहनातून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की अशा लोकांना राज्यात प्रवेश दिला जाणार नाही.

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी स्पाइन रोबोट 

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी जयपूरमध्ये जगातील पहिला स्पाइन तंत्रज्ञानावर आधारित रोबोट तयार करण्यात आला. स्पाइन तंत्रज्ञानामुळे हा रोबोट स्वतःचे संतुलन राखतो. हा रोबोट थर्मल स्क्रीनिंग आणि मास्क नसलेल्या रूग्णांची ओळख पटवू शकतो. यात वापरलेली 95% उपकरणे भारतात तयार झाली आहेत. 

अपडेट्स...

> देशात आतापर्यंत 20 लाख 39 हजार 952 कोरोना नमुन्यांची तपासणी झाली आहे. मागील 3 दिवसांपासून दररोज 90 हजारांहून अधिक चाचण्या घेतल्या जात आहेत.

> लॉकडाउनमुळे रद्द केलेल्या सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा आज संध्याकाळी 5 वाजता होईल. उर्वरित सर्व विषय नाहीत तर फक्त 29 विषयांची चाचणी घेण्यात येईल, असे मंडळाने आधीच नमूद केले आहे.

> ऑपरेशन समुद्र सेतुअंतर्गत भारतीय नौदलाचे जहाज आयएनएस जलाश्व मालदीवची राजधानी माले येथून 588 भारतीयांना घेऊन रवाना झाले आहे. हे जहाज रविवारी केरळच्या कोचिन बंदरावर दाखल होईल. 

> अमेरिकेच्या नेवार्कहून 121 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान शनिवारी पहाटे 3.14 वाजता हैदराबादला पोहोचले.

> केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, जर एखादा मजूर रस्त्यावर दिसला तर त्याला जवळच्या निवारा गृहामध्ये घेऊन जा आणि त्याला अन्न आणि पाणी द्या. मंत्रालयाने म्हटले आहे की ज्या कामगारांना त्यांच्या घरी जायचे आहे त्यांच्यासाठी रेल्वे आणि बसची व्यवस्था करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

बातम्या आणखी आहेत...