आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 17 May 2020 LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:बाधितांचा आकडा 91 हजार 463 वर; राष्ट्रपती भवनातील दिल्ली पोलिसांचा एसीपी पॉझिटिव्ह

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 मेपर्यंत देशात 39826 कोरोनाग्रस्त होते, 16 मे रोजी हा आकडा 90651 वर पोहोचला
  • 2 मेपर्यंत 10852 रुग्ण बरे झाले होते, आता हा आकडा 34224 झाला आहे

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 91 हजार 374 झाली आहे. रविवारी महाराष्ट्रात 2347, दिल्लीत 422, राजस्थान 123, ओडिशा 91, कर्नाटक 54, आंध्रप्रदेश 25, हरियाणा 7, पंजाब 18 आणि असाममध्ये 3 रुग्ण सापडले.

31 जानेवारी रोजी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. जवळपास 74 दिवसांनंतर 13 एप्रिल रोजी कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 545 झाला होता. परंतु केवळ 3 दिवसांत मागील 10 हजार रुग्णांची वाढ झाली. 13 मे रोजी 78 हजार 56 रुग्ण होते. तीन दिवसांनंतर 16 मे रोजी हा आकडा 90 हजारांच्या पार झाला आहे. यासोबतच राष्ट्रपती भवनात तैनात दिल्ली पोलिसातील एसीपीला कोरोनाची लागण झाली आहे.

शनिवारी एका दिवसात सर्वाधिक 4792 रुग्णांची वाढ झाली तर 3979 रुग्ण बरे झाले. महाराष्ट्रात संक्रमितांची संख्या 30 हजार, तर गुजरात आणि तमिळनाडूत 10 हजार पार झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात 90 हजार 927 कोरोना रुग्ण आहेत. 53 हजार 946 जणांवर उपचार सुरू असून 34 हजार 108 बरे झाले आहेत. कोरोनामुळे देशभरात 2872 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अपडेट्स...

> बीएसएफचे आणखी 10 जवान कोरोना संक्रमित. यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या जवानांपैकी 13 जणांना शनिवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

> एअर इंडिया एक्सप्रेसचे विशेष विमान ओमानवरुन 183 भारतीयांना घेऊन तिरुवनंतपुरम रवाना झाले.

> मालदीवहून 588 भारतीयांना घेऊन रविवारी नौदलाचे आयएनएस जलाश्व रविवारी कोचिन येथे दाखल झाले. याआधी एअर इंडियाचे विशेष विमान शिकागोहून 168 भारतीयांना घेऊन पहाटे हैदराबादला पोहोचले.

> शनिवारी महाराष्ट्रात 1606, गुजरातमध्ये 1057, तमिळनाडूत 477, दिल्लीत 438, राजस्थानात 213, उत्तरप्रदेशात 201, मध्यप्रदेशात 195, पश्चिम बंगालमध्ये 115, बिहारमध्ये 112, जम्मू-कश्मीरमध्ये 108 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये 12 गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. 

> गुजरातमध्ये 700 सुपर स्प्रेडर कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. आरोग्य सेतु अॅपद्वारे अलर्ट मिळाल्यानंतर प्रशासनाने यासाठी अभियान चालवले होते. फळ, भाजी, दूध विक्रीशी संबंधित लोकांना सुपर स्प्रेडर म्हटले जाते. हे अनेक लोकांच्या संपर्कात येतात. यांपासून संसर्ग वाढण्याचा धोका जास्त असतो. 

> रेल्वे मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, आम्ही कोणत्याही जिल्ह्यात श्रमिक स्पेशल ट्रेन पाठवण्याची तयार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांची यादी रेल्वेच्या नोडल अधिकाऱ्यांना पाठवावी. रेल्वेने 15 मे पर्यंत 1074 स्पेशल गाड्यांद्वारे 14 लाख लोकांना गृहराज्यात पोहचवले आहे.

> पंजाबमध्ये 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. मात्र 18 मे रोजी कर्फ्यू समाप्त केला जाईल. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केंद्र सरकारला देशव्यापी लॉकडाउन कायम ठेवण्याची सूचना दिली आहे. मिझोरममध्ये देखील लॉकडाउन वाढवला आहे. 

बातम्या आणखी आहेत...