आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 18 May LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:रुग्णांचा आकडा 97 हजार 987 वर: संक्रमितांचा रिकव्रीह रेट वाढून 38.29% झाला

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो अहमदाबादचा आहे. प्रवासी मजुरांनी घरी जाण्यासाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्यावरुन गोंधळ घातला. - Divya Marathi
फोटो अहमदाबादचा आहे. प्रवासी मजुरांनी घरी जाण्यासाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्यावरुन गोंधळ घातला.
  • रविवारी देशभरात 2538 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 152 लोकांचा मृत्यू झाला

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 97 हजार 987 झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मागील 24 तासात 2715 संक्रमित कोरोनामुक्त झाले. रुग्णांचा ठीक होण्याचा दर 38.29% झाला आहे. दरम्यान, बीएसएफच्या आणखी 44 जवानांनी कोरोनाला हरवले. आतापर्यंत 192 जवान ठीक झाले आहेत, तर 163 वर उपचार सुरू आहे.

आतापर्यंत 36 हजार 795 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या महिन्याच्या पहिल्या तारखेला जवळपास इतकेच (37 हजार 262) संक्रमित होते. आता एकूण 55 हजार 872 रुग्णांवर उपाचर सुरू आहे. तर 3025 जणांचा मृत्यू झाला आहे. 

सोमवारी महाराष्ट्रात 2033, दिल्लीत 299, राजस्थानमध्ये 140, कर्नाटकात 84, आंध्रप्रदेशात 52, ओडिशात 48, बिहारमध्ये 6, तर आसाम, हरियाणा आणि गोवामध्ये प्रत्येकी 2 रुग्ण आढळले. याआधी रविवारी देशात सर्वाधिक 5015 रुग्ण सापडले तर 2538 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 

गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश लॉकडाउन-4 मध्ये लावलेले नियम शिथिल करू शकत नाहीत. ते स्थानिक परिस्थितिचा आढावा घेऊन आरोग्य विभागाच्या दिशा-निर्देशांप्रमाणे अजून कडक करू शकतात.

महाराष्ट्रात एका दिवसात 2347 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 33 हजार पार झाली आहे. यातील 20 हजार एकट्या मुंबईतील आहेत. याशिवाय गुजरात आणि तमिळनाडूत संक्रमितांची संख्या प्रत्येकी 11 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. मागील 24 तासांत तमिळनाडूत 639, दिल्लीत 422, गुजरातमध्ये 391, राजस्थानात 242, उत्तरप्रदेशात 206, मध्यप्रदेशात 187, पश्चिम बंगालमध्ये 101, बिहारमध्ये 106, ओडिशाात 91, जम्मू-कश्मीरमध्ये 62 आणि कर्नाटकात 55 नवीन रुग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 95 हजार 169 संक्रमित आहेत. 56 हजार 316 रुग्णांवर उपचार सुरू असून 36 हजार 823 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे देशात 3029 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

राष्ट्रपती भवनात पोहचला कोरोना 

दिल्ली पोलिसांनुसार, राष्ट्रपती भवनात तैनात असलेल्या एका 58 वर्षीय एसीपीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ते राष्ट्रपती भवनाच्या पोलिस लाईनमध्ये तैनात होते. 13 मे रोजी एसीपीसह पाच पोलिसांची कोरोना चाचणी झाली होती. त्यानंतर सर्व पोलिस क्वारंटाईनमध्ये होते.

बातम्या आणखी आहेत...