आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 19 July News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:रुग्णांचा एकूण आकडा 11 लाखांच्या पुढे; यातील 6 लाख 96 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी(दि.19) देशभरात 35 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 645 पेक्षा जास्त मृत्यू झाले. सध्या देशातील एकूण संक्रमितांचा आकडा 11 लाखांच्या पुढे गेला आहे. सध्या देशात 11 लाख 13 हजार 400 रुग्ण झाले आहेत. चांगली बाब म्हणजे, यातील 6 लाख 96 हजार 073 रुग्ण ठीक झाले आहेत. तसेच, आतापर्यंत 27 हजार 472 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. सध्या देशभरात 3 लाख 88 हजार 453 रुग्णांवर उपचार सुरू आहे. हे आकडे covid19india.org नुसार आहेत.

देशात सामुहिक संसर्गाला सुरुवात 

इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.व्हीके यादव म्हणाले की, आता देशात कोरोनाच्या सामुहिक संसर्ग पसरण्यास सुरुवात झाली आहे. परिस्थिती बिघडली आहे. त्यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, दररोज 30 हजाराहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत. सर्वात वाईट म्हणजे आता हे संक्रमण ग्रामीण भागात पसरत आहे.

देशात आतापर्यंत 1% लोकसंख्येचीच झाली कोरोना चाचणी, यासाठी लागले 170 दिवस

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे विक्रमी 3.61 लाख नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत 1.34 कोटींची तपासणी झाली. म्हणजे 170 दिवसांत केवळ 1% लोकसंख्येची तपासणी होऊ शकली. तपासणी वाढल्याने रुग्ण वाढत असून देशात सध्या केवळ 1,253 लॅब आहेत.

ब्रिटन 19% आणि रशियाने 17% तपासण्या केल्या

> अधिक संसर्ग असलेल्या देशांत ब्रिटनने 19%, रशिया 17%, अमेरिका 14% व स्पेनने 13% लोकसंख्येच्या चाचण्या केल्या.

> दर 10 लाख लोकसंख्येत तपासणीच्या हिशेबाने भारत पहिल्या 100 देशांतही नाही. 10 लाखांत 9,730 जणांचीच तपासणी.

> देशात दर 100 जणांत 8 रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा व दिल्लीत हा दर सर्वाधिक.