आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 2 June News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 2 लाखांच्या पुढे; भारताचा रिकव्हरी रेट 48.3 वर

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो भोपाळच्या कोव्हिड चिरायु रुग्णालयातील आहे. सोमवारी येथील 100 पेक्षा जास्त रुग्णांना डिस्टार्ज देण्यात आला. - Divya Marathi
हा फोटो भोपाळच्या कोव्हिड चिरायु रुग्णालयातील आहे. सोमवारी येथील 100 पेक्षा जास्त रुग्णांना डिस्टार्ज देण्यात आला.
  • अमेरिकेक सर्वात वेगाने 72 दिवसात 2 लाख रुग्ण झाले, भारतात 125 दिवसात

देशातील कोरोना संक्रमितांच्या संख्येने मंगळवारी 2 लाखांचा टप्पा पार केला आहे. आता 2 लाख रुग्णसंख्या असलेला भारत जगातील 7वा देश बनला आहे. 30 जानेवारीला देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर 98 दिवसात, म्हणजेच 6 मे रोजी हा आकडा 50 हजारांवर आला. नंतरच्या 27 दिवसात संक्रमणाचा आकडा 2 लाखांच्या पुढे गेला.

परंतू, सर्वात जास्त लोकसंख्या असूनही, ही गती इतर देशांच्या तुलनेत खूपच मंद आहे. अमेरिकेत सर्वात जास्त 72 दिवसात कोरोना संक्रमणाचा आकडा 2 लाखांच्या पुढे गेला. भारताला हा आकडा पार करण्यासाठी 125 दिवस लागले. देशात 1.5 लाखांवरुन 2 लाखांच्या टप्पा पार करण्यासाठी फक्त 7 दिवस लागले.

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 2 लाख 1 हजार 7 झाला आहे. मंगळवारी महाराष्ट्रात 2287 तमिळनाडुत 1091, राजस्थान 171, बिहार 104, ओडिशा 141, आंध्रप्रदेश 115, उत्तराखंड 40, असम 28 आणि मिजोरममध्ये 12 नवीन रुग्ण सापडले. दिल्लीचे उप राज्यपाल अनिल बैजल यांच्या ऑफिसमधील 13 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तिकडेर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी 'दिल्ली कोरोना' इॅप लॉन्च केले आहे.

देशात आतापर्यंत 95 हजार 852 रुग्ण ठीक झाले

या सर्वात चांगली बाब म्हणजे, इतर कोरोना प्रभावित देशांच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट चांगला आहे. देशातील 2 लाख रुग्णांपैकी 95 हजार 852 रुग्ण ठीक झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 48.3% आहे. म्हणजेच, 100 पैकी 48 रुग्ण ठीक होत आहेत. येकेमध्ये सर्वात कमी रिकव्हरी रेट आहे. तेथे दोन लाख रुग्णांपैकी फक्त 0.001% रुग्ण ठीक झाले आहेत. स्पेनमध्ये सर्वाधिक 68.69% रिकव्हरी रेट आहे.

आता दर 7 दिवसात 50 हजार रुग्ण वाढत आहेत

चिंतेची बाब म्हणजे, देशात कोरोना संक्रमितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. 6 मे रोजी देशात कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारांवर होता. म्हणजेच, संक्रमणाच्या सुरुवातीपासून 50 हजार रुग्ण होण्यासाठी 98 दिवस लागले. पण, त्यानंतर फक्त 12 दिवसात 50 हजार रुग्ण वाढले. त्यानंतर आता 7-8 दिवसात 50 हजार रुग्ण वाढत आहेत.

सोमवारी महाराष्ट्रात 2,361, तमिळनाडुत 1,162, दिल्ली 990, गुजरात 423, उत्तरप्रदेश 286, प. बंगाल 271, राजस्थान 269, हरियाणा 265, मध्यप्रदेश 194, कर्नाटक 187, जम्मू-काश्मीर 155 आणि बिहारमध्ये 138 रुग्ण सापडले. याशिवाय,  6,414 रुग्ण आहेत, पण ते कोणत्या राज्यातील आहेत, याबाबत माहिती नाही. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे. दरम्यान, भारत रुग्णांच्या संख्येत जगातील 7वा देश बनला आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटेन आणि इटली या देशात भारतापेक्षा जास्त रुग्ण आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, मागील 24 तासात देशभरात 8 हजार 171 रुग्णांची नोंद झाली असू, 204 मृत्यू झाले आहेत. यासोबतच देशातील संक्रमितांचा आकडा इसके साथ देशा में संक्रमितों की संख्या 1 लाख 98 हजार 706 आहेत. यातील 97 हजार 581 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 95 हजार 526 ठीक झाले आहेत. आतापर्यंत 5 हजार 598 रुग्णांचा आजाराने बळी घेतला आहे.

मृत्यूदर घटतो आहे : आरोग्य मंत्रालय 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी म्हटले की, देशात कोरोनाने मृत्यूचा दर घटून 2.83 टक्क्यांवर आला आहे. अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्ससारख्या देशांपेक्षा तो खूप कमी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 48.19 टक्के झाले असल्याचा दावाही मंत्रालयाने केला.

कोरोना अपडेट्स 

- दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवालांनी आज 'दिल्ली कोरोना' अॅप लॉन्च केला. या माध्यमातून दिल्लीतील कोणत्या रुग्णालयात किती बेड आहेत, याबाबत माहिती मिळेल. याप्रसंगी त्यांनी म्हटले की, ज्या रुग्णांना डॉक्टरांनी अॅडमीट होण्यासाठी सांगितले आहे, अशाच रुग्णांनी बेडची मागणी करावी. ज्यांचा उपचार घरात होऊ शकतो, त्यांनी बेडसाठी हट्ट धरू नये.

- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, फ्रांससोबत त्यांची चर्चा झाली आहे. फ्रांसने विश्वास दिला आहे की, कोरोना काळातही राफेलची डिलीव्हरी वेळेवर होईल.

- केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज 'आत्मनिर्भर भारत'ची परिभाषा सांगितली. त्यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारताचा अर्थ जगापासून आयसोलेट होणे नाही. भारत आपली क्षमता, कौशल्य, व्हॅल्यू चेन आणि मॅन्युफैक्चरिंगमुळे नव्या रुपाने जगासमोर येईल. हा आहे आत्मनिर्भर भारत.

बातम्या आणखी आहेत...