आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील कोरोना संक्रमितांची संख्या 39 हजार 242 झाली आहे. तसेच 10 हजारांपेक्षा अधिक लोक बरे झाले आहेत. शनिवारी महाराष्ट्रात 790, गुजरातमध्ये 333, उत्तरप्रदेश 159, पंजाब 187, मध्यप्रदेश 73 सह 1900 पेक्षा जास्त रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. मागील 24 तासात सर्वात जास्त 1061 रुग्ण ठीक झाले असून, देशातील संक्रमितांचा रिकव्हरी रेट 26.65 % झाला आहे.
शुक्रवारी महाराष्ट्रात विक्रमी 1008 रुग्णांची वाढ झाली. याशिवाय गुजरातमध्ये 326, दिल्लीत 264, पंजाबमध्ये 105, राजस्थानात 82, तमिळनाडूत 203, बिहारमध्ये 41 यांसह देशभरात 2391 पेक्षा अधिक रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात एकूण 37 हजार 336 कोरोनाग्रस्त आहेत. 26 हजार 167 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 9950 रुग्ण बरे झाले आहेत तर 1218 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
एकाच बिल्डिंगमधील 41 लोक कोरोना पॉझिटिव्ह
दिल्लीतील कापसहेडा भागात एकाच बिल्डिंगमधील 41 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 18 एप्रिलला या बिल्डिंगमध्ये पहिला संक्रमित आढळून आला होता. त्यानंतर ही बिल्डिंग सील करून तेथे राहणाऱ्या 176 लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते. 11 दिवसांनंतर यापैकी 67 लोकांचा रिपोर्ट आला असून यामधील 41 पॉझिटिव्ह आहेत.
केंद्रीय सुरक्षा दलाच्या 68 जवांना रिपोर्ट पॉझिटिव्ह
केंद्रीय सुरक्षा दलाच्या आणखी 68 जवानांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व जण पूर्व दिल्लीतील सीआरपीएफ बटालियनच्या छावणीतील आहेत. या कॅम्पमध्ये आतापर्यंत 122 जवानांना संसर्ग झाला आहे. यासोबत या सुरक्षा दलाच्या 127 जवानांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यातील एक जण बरा झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे.
मजूर स्पेशल 6 गाड्या चालविण्यात आल्या
लॉकडाऊन दरम्यान, इतर राज्यात अडकलेल्या कामगार, विद्यार्थी आणि इतरांसाठी 24 तासांमध्ये 6 विशेष रेल्वे गाड्या चालवल्या गेल्या. गुरुवारी पहाटे पहिली ट्रेन तेलंगणामधील लिंगमपल्ली येथून झारखंडमधील हटियासाठी रवाना झाली. रात्री उशिरा हाटिया येथे पोहोचली. याशिवाय उर्वरित रेल्वे गाड्या जयपूर (राजस्थान) ते पटना (बिहार), कोटा (राजस्थान) ते हटिया (झारखंड), नाशिक (महाराष्ट्र) ते लखनऊ (उत्तर प्रदेश), नाशिक (महाराष्ट्र) ते भोपाळ (मध्य प्रदेश), लिंगमपल्ली (तेलंगणा) ते हटिया (झारखंड) आणि अलुवा (केरळ) पासून भुवनेश्वर (ओडिशा) साठी सोडण्यात येणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.