• Home
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 21 May LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना / आतापर्यंत 1 लाख 13 हजार 400 प्रकरणे : आता दर 2 दिवसांनी 10 हजारांहून अधिक रुग्णांची होतीये वाढ

हा फोटो उत्तरप्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस-वेवरील आहे. प्रवासी मजुरांसाठी सामाजिक कार्यकर्ते खाण्या-पिण्याचा पुरवठा करत आहेत. हा फोटो उत्तरप्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस-वेवरील आहे. प्रवासी मजुरांसाठी सामाजिक कार्यकर्ते खाण्या-पिण्याचा पुरवठा करत आहेत.

  • मागील 7 दिवसांत 19 हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले, काल 3113 जणांना रुग्णालयातून सुटी दिली

दिव्य मराठी

May 21,2020 09:34:53 PM IST

नवी दिल्ली. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 13 हजार 400 झाली आहे. 3 दिवसांपूर्वी ही संख्या 1 लाखाच्या पार पोहचली होती. या आठवड्यात रुग्णांच्या वाढीची गती आधीपेक्षा वेगवान झाली आहे. ही गती दर 2 दिवसांत 8 हजारांवरून 10 हजारांवर गेली आहे. 15 मे रोजी संक्रमितांची संख्या 85 हजार 855 होती, जी 17 मे रोजी 95 हजार 698 झाली. 19 मे रोजी हा आकडा 1 लाख 6 हजार 480 वर पोहचला. सुखद बाब म्हणजे आता दररोज सरासरी अडीच हजार रुग्ण बरे होत आहेत. मागील सात दिवसांत 19 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

लॉकडाउन-4 मध्ये अनेक राज्यात सोशल डिस्टेंसिंग आणि केंद्राच्या गाइडलाइनचे योग्य प्रकारे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. यासाठी गुरुवारी केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीले. त्यात त्यांनी लॉकडाउनच्या नियमांची कडक अंमलबजावनी करण्यासंबंधी निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारने राज्यांना सांगितले की, नाइट कर्फ्यू गाइडलाइनचा महत्वाचा भाग आहे. संध्याकाळी 7 पासून सकाळी 7 पर्यंत प्रशासानाने कर्फ्यू चालवावा.

गुरुवारी महाराष्ट्रात 2345, दिल्ली 571, तमिळनाडू 776, राजस्थान 139, बिहार 124, कर्नाटक 143, ओडिशा 51 सह 307 रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 12 हजार 359 रुग्ण आहेत. यातील 63 हजार 624 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, 45 हजार 299 ठीक झाले आहेत. तसेच, आतापर्यंत देशात 3435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी 5547 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. महाराष्ट्रात सर्वाधिक 2161 रुग्ण वाढले. यानंतर तमिळनाडूत 743, दिल्लीत 534, गुजरातमध्ये 398, मध्यप्रदेशात 270 रुग्ण सापडले.

X
हा फोटो उत्तरप्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस-वेवरील आहे. प्रवासी मजुरांसाठी सामाजिक कार्यकर्ते खाण्या-पिण्याचा पुरवठा करत आहेत.हा फोटो उत्तरप्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस-वेवरील आहे. प्रवासी मजुरांसाठी सामाजिक कार्यकर्ते खाण्या-पिण्याचा पुरवठा करत आहेत.