आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 22 May LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:संक्रमितांचा आकडा 1 लाख 19 हजार 521 वर: केंद्राने परदेशातील भारतीय नागरिकांना भारतात येण्याची दिली परवानगी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो पाटण्यातील आहे. वेगवेगळ्या राज्यातील स्थलांतरित कामगार बसमध्ये जाण्यासाठी पायी जाताना - Divya Marathi
हा फोटो पाटण्यातील आहे. वेगवेगळ्या राज्यातील स्थलांतरित कामगार बसमध्ये जाण्यासाठी पायी जाताना
  • महाराष्ट्र, तमिळनाडूस, गुजरात, दिल्ली आणि राजस्थानात 86 हजारांपेक्षा अधिक रुग्ण
  • देशात गुरुवारी 6025 रुग्णांची वाढ, एका दिवसात संक्रमितांचा दुसरा मोठा आकडा

देशात कोरोना संक्रमितांचा आकडा 1 लाख 24 हजार 73 झाला आहे. संक्रमण 26 राज्य आणि7 केंद्रशासित प्रदेशात पसरला आहे. यापैकी सर्वात जास्त 86 हजारांपेक्षा जास्त, म्हणजेच 73% रुग्ण 5 राज्यात आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात एक दिवसातील सर्वात जास्त 2940 रुग्ण सापडले. केरळमध्ये सापडलेल्या नवीन संक्रमितांपैकी 17 परदेशी आणि 21 महाराष्ट्रातून परतले होते. तसेच, केंद्र सरकारने सांगितले की, देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. 19 मेला 3.13% मृत्यूदर होता, आता 3.02% झाला आहे.

शुक्रवारी महाराष्ट्रात 2940, दिल्ली 660, तमिळनाडू 786, गुजरात 363, राजस्थान 150, कर्नाटक 138, बिहार 118, ओडिशा 86 आणि आंध्रप्रदेशात 62 सह 217 रुग्ण सापडले आहेत. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 18 हजार 447 संक्रमित आहेत. यापैकी 66 हजार 330 रुग्णांवर उपचार सुरू आहे, 45 हजार 299 कोरोनामुक्त झाले आहेत, तर 3583 बळी गेले आहेत.

गृह मंत्रालयाने ओसीआयसाठी अटी घातल्या आहेत. ओसीआय कार्डधारकांच्या परदेशात जन्मलेल्या लहान मुलांना, ज्या कुटुंबात आपत्कालीन परिस्थिती आहे, जसे एखाद्याचा मृत्यू झाला असेल अशा कार्डधारकांना, असे दाम्पत्य ज्यांच्यातील एकाकडे ओसीआय कार्ड आहे आणि त्या दोघांचा भारतात कायम पत्ता आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कार्ड आहे, परंतु त्यांचे पालक भारतात राहतात. अशा नागरिकांना भारतात येण्याती परवानगी दिली जाईल. 

देशात आतापर्यंत कोरोनामुळे 3583 मृत्यू 

शुक्रवारी आंध्रप्रदेशात 62, राजस्थानमध्ये 54, उत्तरप्रदेशात 6, झारखंडमध्ये 5, छत्तीसगडमध्ये 4 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. या व्यतिरिक्त आणखी 217 रूग्ण आहेत, परंतु ते कोणत्या राज्यातील आहेत याची माहिती मिळाली नाही. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 18 हजार 447 कोरोनारुग्ण आहेत. यातील 66 हजार 330 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 45 हजार 299 रुग्ण बरे झाले. कोरोनामुळे देशात 3583 जणांचा मृत्यू झाला आहे. 

देश कोरोना अपडेट्स

  • दिल्ली एम्समध्ये आरपीसी डॉक्टर कँटीनमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झाला. कोरोनामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याचा रहिवासी डॉक्टर असोसिएशनचा आरोप आहे, परंतु वसतिगृह अधीक्षकांनी त्या कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यासारखे दाखवण्याचा प्रयत्न केला.
  • महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 41 हजार 642 वर पोहचला आहे. यात एकट्या मुंबईत आतापर्यंत 25 हजार 500 प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण संक्रमितांपैकी मुंबईत 61% रुग्ण आहेत. देशातील एकूण संक्रमितांपैकी 22% रुग्ण एकट्या मुंबईत आहेत.
बातम्या आणखी आहेत...