• Home
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 23 May LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना / संक्रमितांचा आकडा 1 लाख 30 हजार 504 वर: सिक्किममध्ये पहिला रुग्ण आढळला; तमिळनाडुत 15 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

फोटो पटनाचा आहे. येथील प्रवासी मजुरांन त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहे. फोटो पटनाचा आहे. येथील प्रवासी मजुरांन त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहे.
हे चित्र अहमदाबादचे आहे. प्रवासी मजूर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी वाहनाच्या प्रतिक्षेत लाइनमध्ये बसले आहेत. त्यांना विशेष ट्रेनने बिहारला पाठवण्यात आले. हे चित्र अहमदाबादचे आहे. प्रवासी मजूर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी वाहनाच्या प्रतिक्षेत लाइनमध्ये बसले आहेत. त्यांना विशेष ट्रेनने बिहारला पाठवण्यात आले.
चित्र पाटण्याचे आहे. वेगवेगळ्या राज्यांतील स्थलांतरित लोक आपल्या गावाला जाण्यासाठी बसमध्ये जागा मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. चित्र पाटण्याचे आहे. वेगवेगळ्या राज्यांतील स्थलांतरित लोक आपल्या गावाला जाण्यासाठी बसमध्ये जागा मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहेत.

  • देशात वेळेवर लॉकडाऊन नसते तर 2.1 लाख बळी गेले असते - केंद्र सरकार

दिव्य मराठी

May 23,2020 08:55:05 PM IST

नवी दिल्ली. देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 1 लाख 27 हजार 274 झाला आहे. शनिवारी महाराष्ट्रात 2608, तमिळनाडुत 759, दिल्ली 591, कर्नाटक 196, राजस्थानमध्ये 163, बिहार 179, ओडिशा 80, असाम 60 आणि आंध्रप्रदेशात 47 रुग्णांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. हे आकडे covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 25 हजार 101 संक्रमित आहेत. यापैकी 69 हजार 597 रुग्णांवर उपचार सुरू आहे. 51 हजार 783 ठीक झाले आहेत आणि 3720 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मागील 10 दिवसांत 49 हजार 326 रुग्ण वाढले. गेल्या 4 दिवसांपासून सलग 5 हजारांपेक्षा अधिक संक्रमित वाढत आहेत. 19 मे रोजी 6154 रुग्ण, 20 मे रोजी 5720, 21 मे रोजी 6023 आणि 22 मे रोजी 6570 रुग्णांची वाढ झाली.

सिक्किममध्ये कोरोना संक्रमणाचे पहिले प्रकरण आढळले आहे. दिल्लीवरुन आलेल्या 25 वर्षीय विद्यार्थ्याची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. तिकडे, तमिळनाडुत कोरोना संक्रमितांची संख्या 15 हजारांच्या पुढे गेली आहे. शनिवारी राज्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला.

कर्नाटकमध्ये 6 राज्यातून आलेले 14 दिवस क्वारेंटाइन राहतील

कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे की, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू आणि मध्यप्रदेशातून येणाऱ्या नागरिकांना सेवा सिंधु पोर्टलवरुन ई-पास घ्यावा लागेल. तसेच, राज्यात आल्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारेंटाइन राहावे लागेल.

हाय रिस्क झोनमध्ये तैनात योद्ध्यांना हायड्रोक्सीक्लोरोक्विन देणार

संसर्गाविरूद्ध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (एचसीक्यू) चे चांगले परिणाम समोर आले आहेत. आता केंद्र सरकार एचसीक्यूचा वापर ड्यूटीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आणि उच्च जोखमीच्या क्षेत्रातील इतर कोरोना योद्धांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करेल. नॅशनल टास्क फोर्सच्या निदर्शनास आले आहे की एचसीक्यूच्या गोळ्या घेणाऱ्या दिल्ली एम्ससह इतर रुग्णालयांमधील आरोग्य कर्मचार्‍यांना संक्रमणाचा धोका कमी होता.

देशात वेळेवर लॉकडाऊन नसते तर 2.1 लाख बळी गेले असते - केंद्र सरकार

सरकारने सांगितले की, लॉकडाऊन नसते तर रुग्णांची संख्या 30 लाखांपर्यंत पोहोचली असती. विविध अहवालांचा हवाला देत अधिकाऱ्यांनी दावा केला की, देशात वेळेवर लॉकडाऊन नसते तर 2.1 लाख बळी गेले असते.


रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती

रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती आहे. राज्यात एका दिवसांत आजवरचे सर्वाधिक 2940 रुग्ण आढळले. दिल्लीतही शुक्रवारी आतापर्यंतचे सर्वाधिक 660 रुग्ण आढळले. येथे एकूण 12,319 लोक बाधित आहेत, तर 208 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 363 नवे रुग्ण आढळले. यापैकी 275 तर अहमदाबादेतच आढळले आहेत. याशिवाय तामिळनाडूत 768, बिहार मध्ये 118 आणि उत्तर प्रदेशात 152 नवे रुग्ण आढळले आहेत.ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 25 हजार 447 कोरोनारुग्ण आहेत. यातील 69 हजार 597 जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 51 हजार 783 रुग्ण बरे झाले तर 3720 जणांचा मृत्यू झाला आहे.

100 वर्षांच्या आजींची कोरोनावर मात

मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये 100 वर्षीय चंदा बाई यांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी अरबिंदो रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर घरी पोहचल्या असता शेजाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. चंदा बाई यांच्या कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 5 जण बरे झाले आहेत.

X
फोटो पटनाचा आहे. येथील प्रवासी मजुरांन त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहे.फोटो पटनाचा आहे. येथील प्रवासी मजुरांन त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहे.
हे चित्र अहमदाबादचे आहे. प्रवासी मजूर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी वाहनाच्या प्रतिक्षेत लाइनमध्ये बसले आहेत. त्यांना विशेष ट्रेनने बिहारला पाठवण्यात आले.हे चित्र अहमदाबादचे आहे. प्रवासी मजूर रेल्वे स्थानकात जाण्यासाठी वाहनाच्या प्रतिक्षेत लाइनमध्ये बसले आहेत. त्यांना विशेष ट्रेनने बिहारला पाठवण्यात आले.
चित्र पाटण्याचे आहे. वेगवेगळ्या राज्यांतील स्थलांतरित लोक आपल्या गावाला जाण्यासाठी बसमध्ये जागा मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहेत.चित्र पाटण्याचे आहे. वेगवेगळ्या राज्यांतील स्थलांतरित लोक आपल्या गावाला जाण्यासाठी बसमध्ये जागा मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहेत.