आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 24 May LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:संक्रमितांचा आकडा 1 लाख 33 हजार 837 वर: केंद्रीय सशस्त्र दलात 15 दिवसात दुप्पट रुग्ण, 1180 संक्रमित जवानांपैकी 60% ठीक झाले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संक्रमितांचा आकडा 1 लाख 32 हजारांच्या पुढे: या आठवड्यात 40 हजार 773 रुग्ण वाढले, तर 20 हजार 128 कोरोनामुक्त झाले

केंद्रीय सशस्त्र दलात 15 दिवसात संक्रमण दुपटीने वाढऊन 1180 झाले आहे. परंतू, चांगली बाब म्हणजे सर्वात जास्त रिकव्हरी रेट सशस्त्र दलाच्या जवानांचा आहे. आतापर्यंत 60% जवान कोरोनामुक्त झाले आहेत. बीएसएफचे 400 पेक्षा जास्त संक्रमितांपैकी 286 ठीक झाले आहेत. फक्त दोघांचा मृत्यू झाला. तसेच, सीआरपीएफमध्ये 359 केस मिळाले, यापैकी 220 ठीक झाले. 

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 1 लाख 33 हजार 784 झाला आहे. मागच्या रविवारी, म्हणजेच 16 म रोजी संक्रमितांची संख्या 90 हजार 649 होती. त्या दिवसापर्यंत 34 हजार 257 रुग्ण ठीक झाले होते, तर 2872 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज सकाळपर्यंत देशात 1 लाख 31 हजार 422 संक्रमित झाले. तर, 54 हजार 385 रुग्ण ठीक झाले आणि 3867 मृत्यू झाले. म्हणजेच मागील 7 दिवसात 40 हजार 773 रुग्ण वाढले आणि 20 हजार 128 ठीक झाले.

आज महाराष्ट्रात 3,041, तमिळनाडुत 765, दिल्ली 508, राजस्थान 152, कर्नाटक 130, बिहार 117, ओडिशा 67, आंध्रप्रदेश 66, उत्तराखंड़ 54, चंडीगड 13, गोवा 11 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या.  ही आकडेवारी covid19india.org आणइ राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आहे. केंद्री आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 31 हजार 868 संक्रमित आहेत. यापैकी 73 हजार 560 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे, तर 54 हजार 440 ठीक झाले आहेत.

महाराष्ट्रात पोलिस विभागातील बाधितांचा वेगही कमी झालेला नाही. आतापर्यंत 1 हजार 671 पोलिसांनी बाधा झाली आहे. त्यात 174 पोलिस अधिकारी, 1 हजार 497 पोलिसांचा समावेश आहे. आतापर्यंत 18 जणांना प्राण गमवावे लागले. आतापर्यंत 541 पोलिस बरे झाले आहेत. राज्यात पोलिसांना लोकांच्या उपद्रवाचाही सामना करावा लागला. त्यात आतापर्यंत 85 पोलिस जखमी झाले.

यूपी : गर्दी जमवून रेशन वाटप, सपा आमदार, मुलावर गुन्हा

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे फिजिकल डिस्टेंन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सपा आमदार इकराम कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरेशी यांनी आपल्या निवासस्थानाबाहेर मुलासह शेकडो लोकांची गर्दी करून रेशनचे वाटप केले. रेशन वाटप करताना त्यांनी फिजिकल डिस्टेन्सिंगच्या नियमांचे मुळीच पालन केले नाही. कुरेशी यांनी मास्कही लावलेला नव्हता. अनेक वर्षांपासून मी अशा प्रकारे घरी रेशन वाटप करत आलो आहे. आता गर्दी झाली तर त्याला काय करावे? अशी प्रतिक्रिया कुरेशी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...