आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 25 May LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:संक्रमितांचा आकडा 1 लाख 44 हजार 113 वर: 13 दिवसात दुप्पट रुग्ण वाढले, पण ठीक होणारे दुपटीपेक्षा जास्त

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन नसते तर आतापर्यंत 50 लाख रुग्ण असते : केंद्र सरकार

देशात कोरोना संक्रमितांचा आकडा 1 लाख 39 हजार 923 झाला आहे. सोमवारी महाराष्ट्रात 2439, दिल्लीत 635, राजस्थान 145, आंध्रप्रदेश 44, ओडिशा 102, बिहार 69, असम74, पुडुचेरी 8, हिमाचल 6, तर मणिपूरमध्ये 2 रुग्ण आढळले. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 38 हजार 845 संक्रमित आहेत. यापैकी 77 हजार 103 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 57 हजार 720 ठीक झाले आहेत. देशभरात 4,021  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 रविवारी देशभरात सर्वाधिक 7,111 संक्रमित आढळले, तर 3,283 रुग्ण ठीकदेखील झाले. देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 13 दिवसात दुप्पट झाला आहे. 11 मे रोजी 70 हजार 767 रुग्ण होते. आज हा आकडा 1 लाख 40 हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. याप्रकारेच 11 मे पर्यंत देशात 22 हजार 549 रुग्ण ठीक झाले. हा आकडा 13 दिवसात दुपटीपेक्षा जास्त झाला आहे. रविवारपर्यंत देशात 57 हजार 692 रुग्ण ठीक झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा ठीक होण्याचा दर 41.28% झाला आहे.भारत सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेला दहावा देश ठरला. आतापर्यंत १.३४ लाख रुग्ण असलेला इराण दहावा देश होता. मात्र, भारतात रुग्णवाढीचा वेग इतर नऊ देशांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. भारतात १० हजारहून १.३ लाख रुग्ण होण्यास ४२ दिवस लागले होते, तर अमेरिकेत केवळ १० दिवसांत ही संख्या वाढली. युरोपीय देशांत २२ ते २८ दिवस लागले होते.भारतात आता १३ दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा दर लॉकडाऊनपूर्वी ३.४ दिवस होता. एका आठवड्यापूर्वी तो १२ दिवस होता. यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, याेग्य वेळी लॉकडाऊन केल्याने संसर्ग नियंत्रणात राहिला आहे. लॉकडाऊन नसते तर आतापर्यंत ५० लाखांहून अधिक रुग्ण झाले असते. केंद्रीय अधिकाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग अनियंत्रित झाल्याचा इन्कार करत ७० टक्के रुग्ण केवळ १० शहरात असल्याने नियंत्रण ठेवणे कठीण नाही, असे सांगितले. कोरोनासाठी नेमण्यात आलेल्या विशेष गटाचे चेअरमन व्ही. के. पॉल म्हणाले, मृत्यूदरही कमी झाला आहे. हे चांगले संकेत आहेत. पूर्वी हा दर ३.१३% होता, आता २.९० वर आहे.

विशेष म्हणजे अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन, इंग्लंड, इटली, फ्रान्स, जर्मनी आणि तुर्की या देशांची एकत्रित लोकसंख्या १०९.८ कोटी म्हणजे भारतापेक्षा २० कोटी कमी आहे. भारतात १,३४,५६८ रुग्ण आहते, तर या ९ देशांत एकूण ३६.५० लाख रुग्ण झाले आहेत. ते भारतापेक्षा २६ पट अधिक आहेत.

देशात एका दिवसात सर्वाधिक ६,७८१ रुग्ण सापडले, महाराष्ट्रात संख्या ५० हजारांवर

देशात रविवारी ६,७८१ नवे रुग्ण आढळले. ही एक दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. सर्वाधिक ३,०४१ रुग्ण महाराष्ट्रात सापडले. या राज्यात रुग्णसंख्या ५०,२८१ झाली आहे. मुंबईत १,७२५ रुग्ण सापडले असून तेथे एकूण रुग्ण ३०,५४२ झाली आहे. दिल्लीत ५०८ रुग्ण सापडले सून एकूण संख्या १३,४१८ झाली. गुजरातमध्ये ३९४ नवे रुग्ण सापडल्याने संख्या १४ हजारांवर गेली. देशात एकूण ४१.५% म्हणजे ५६,२९३ रुग्ण बरे झाले आहेत.

भारतात मृत्यूदर जगातील ९७ देशांपेक्षा कमी आहे. येथे दर १०० रुग्णांपैकी ३ मृत्यू होत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत भारतात दर १० लाख लोकांपैकी केवळ ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या हिशेबाने भारताचे स्थान १२० वे आहे. मात्र, १० सर्वाधिक संसर्ग असलेल्या देशांपैकी भारत व ब्राझीलमध्ये रुग्ण सतत वाढत असल्याने चिंता आहे. उर्वरित ८ देशांत रुग्ण कमी होत आहेत. मृत्यूदराचीही हीच स्थिती आहे. रोज होणाऱ्या मृत्यूंत भारत ५व्या स्थानी पोहोचला आहे.

बातम्या आणखी आहेत...