आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 28 May LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:संक्रमितांचा आकडा 1 लाख 63 हजार 116 वर: वंदे भारत मिशनच्या दुसऱ्या फेजमध्ये 1 लाख प्रवासी भारतात येणार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 पर्यंत पोहचण्यास 97 दिवस लागले होते
  • संक्रमितांची संख्या 50 हजार ते 1 लाख होण्यास 12 दिवस लागले

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, वंदे भारत मिशनच्या दुसऱ्या फेजमध्ये 60 देशातून एक लाख भारतीयांना परत आणले जाईल. यानंतर मिशनच्या तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारने संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, मध्यप्रदेश आणि राजस्थानवरुन येणारी विमाने, ट्रेन आणि इतर वाहनांवर बंदी घातली आहे.

आतापर्यंत देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 63 हजार 116 झाली आहे. गुरुवारी महाराष्ट्रात 2598, तमिळनाडुत 827, प. बंगालमध्ये 344, मध्यप्रदेश 192, राजस्थान 131, आंध्रप्रदेश 128, कर्नाटक 75 आणि बिहारमध्ये 54 रुग्ण सापडले. हे आकडे  Covid19.Org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 58 हजार 333 रुग्ण आहेत. यापैकी 86 हजार 110 रुग्णांवर उपचार सुरू असून, 67 हजार 692 ठीक झाले आहेत. तसेच, आतापर्यंत 4531 मृत्यू झाले आहेत.

बुधवारी एका दिवसात सर्वाधिक 1 लाख 16 हजार 41 सँपलची तपासणी करण्यात आली. याआधी 23 मे रोजी 1 लाख 15 हजार 364 सँपलची चाचणी करण्यात आली होती. 19 मेनंतर 25 आणि 26 मे वगळता प्रत्येक दिवशी 1 लाखापेक्षा जास्त सँपलची चाचणी झाली आहे. 25 मे रोजी 90 हजार 170 आणि 26 मे रोजी 92 हजार 528 जणांचा रिपोर्ट आला होता. आतापर्यंत एकूण 32 लाख 42 हजार 160 सँपलची तपासणी करण्यात आली आहे. 

पुढील 5 दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाखांच्या पुढे जाऊ शकते

देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 1 लाख 58 हजार 73 झाली आहे. बुधवारी एकाच दिवसात सर्वाधिक 7261 नवे रुग्ण आढळले. यापूर्वी 24 मे रोजी 7111 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले होते. 18 मे रोजी रुग्णांचा आकडा 1 लाख होता. पुढील 9 दिवसांत 27 मे रोजी दीड लाख झाला. आता दररोज सरासरी 7000 रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत ही संख्या पुढील 5 दिवसात (2 जूनपर्यंत) 2 लाखांच्या पुढे जाऊ शकते. 

0