आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 28 September News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:भारत जगातील एकमेव देश जिथे 50 लाख रुग्ण कोरोनामुक्त, 27 दिवसांत 29 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू; आतापर्यंत 60.73 लाख प्रकरणे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरात रविवारी 1040 रुग्णांचा मृत्यू, आतापर्यंत एकूण 95 हजार 574 जणांचा बळी

देशातील कोरोना संक्रमणाबाबत दिलासादायक आणि चिंताजनक दोन्ही बातम्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या रविवारी 50 लाख पार झाली आहे. भारत हा जगातील एकमेव देश आहे, जिथे इतके रुग्ण बरे झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 82.74% झाला आहे. म्हणजेच आता प्रत्येक 100 रुग्णांपैकी 82 लोक बरे होत आहेत.

दुसरीकडे चिंताजनक बाबत म्हणजे मागील 27 दिवसांपासून एक हजारापेक्षा जास्त मृत्यू झाले आहे. 31 ऑगस्ट रोजी 816 रुग्णांचा जीव गेला होता. यानंतर 1 ते 27 सप्टेंबरपर्यंत दररोज एक हजारापेक्षा जास्त मृत्यू झाले. परिस्थिती अशी आहे की दररोज सरासरी 1066 लोकांचा जीव जात आहे. जगातील सर्वाधिक संक्रमित देश अमेरिका (895) आणि ब्राझील (826) दैनंदिन सरासरीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे.

या दरम्यान देशात आतापर्यंत 60 लाक 73 हजार 348 प्रकरणे समोर आली आहेत. रविवारी 679 रुग्ण बरे देखील झाले. ही आकडेवारी covid19india,org नुसार आहे.