आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 29 May LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:संक्रमितांचा आकडा 1 लाख 68 हजार 605 वर, तर 4, 706 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संक्रमणाबाबतीत भारत जगात 9 व्यी स्थानी

देशात कोरोना संक्रमितांचा आकडा 1 लाख 68 हजार 605 झाला आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक 116 रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच, राज्यात 2,682 नवीन रुग्णांसोबत एकूण संख्या 62 हजारांच्या पुढे गेली आहे. मागील 24 तासात महाराष्ट्रात सर्वाधिक 8,381 रुग्ण ठीक झाले आहेत. तिकडे, दिल्लीत 1,106 संक्रमित वाढले आणि 82 रुग्णांचा मृत्यू झाला. 

याशिवाय तमिळनाडूत 874, कर्नाटक 178, उत्तराखंड 102, राजस्थान 91, बिहार 90, ओडिशा 63, हरियाणा 31 आणि असाममध्ये 30 रुग्ण सापडले. हे आकडे Covid19.Org वेबसाइटनुसार आहेत. तर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत 1 लाख 65 हजार 799 संक्रमित आहेत. यापैकी 89 हजार 987 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून,  71 हजार 105 ठीक झाले आहेत. तसेच, आतापर्यंत देशात 4,706 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रेल्वे मंत्रालयाने अपील केली आहे की, गरोदर महिला, 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांनी महत्वाचे असेल, तरच ट्रेन प्रवास करावा. मंत्रालयाने गृह मंत्रालयच्या गाइडलाइनचा हवाला देत सांगितले की, या लोकांना कोरोनाचा जास्त धोका आहे. यादरम्यान, राज्यसभा सचिवालयच्या एका अधिकाऱ्यातही कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर संसद भवनातील उपभवनाचे 2 फ्लोअर आणि राज्यसभा सचिवालयला सॅनिटायजेशनसाठी सील करण्यात आले आहे.

गुरुवारी महाराष्ट्रात 2598, दिल्ली 1024, तमिळनाडू 827, गुजरात 367, पश्चिम बंगाल 344, राजस्थान 251, मध्यप्रदेश 192 आणि उत्तरप्रदेशातही अनेक रुग्ण सापडले. ही आकडेवारी Covid19.Org च्या माहितीच्या आधारे आहे. 

संक्रमणात भारत जगात 9 व्यी स्थानी

कोरोना संक्रमितांच्या बाबतीत भारत जगात 9 व्या स्थानी आला आहे. अमेरिका पहिल्या स्थानावर आहेत. तर, आशियात भारत नंबर 1 वर आला आहे. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी गुरुवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी लॉकडाउन वाढवण्याबाबत चर्चा केली. 

लॉकडाऊन-4मध्ये भारतात बरीच सूट देण्यात आली होती. या काळात 10 दिवसांत 60 हजार नवे रुग्ण आढळले. या स्थितीत 31 मे रोजी लॉकडाऊनचा हा टप्पा संपत आहे. यामुळे आगामी काळात काय धोरण ठरवायचे यावर केंद्र व राज्यांत चर्चासुरू आहे. यात सर्वाधिक संसर्ग असलेल्या 13 शहरांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. या शहरांतच देशातील 70 टक्के रुग्ण आहेत. यात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता/हावडा, इंदूर, जयपूर, जोधपूर आणि तामिळनाडूतील चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूरचा समावेश आहे.

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी पुन्हा राज्याच्या सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. तर, हिमाचल प्रदेशात 60 टक्के प्रवाशांसह 6,500 आंतरराज्य बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...