आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus outbreak india cases 5 june live news and updates maharashtra pune madhya pradesh indore rajasthan uttar pradesh haryana bihar punjab novel corona covid 19 death toll india today

देशात कोरोना :देशात शुक्रवारी सर्वाधिक 9, 838 नवीन रुग्णांची नोंद, तर एकूण रुग्णसंख्या 2 लाख 33 हजार 789 वर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो कोलकाताच्या हावडा स्टेशनचे आहे. प. बंगालमध्ये परप्रांतीयांचे पलायन सुरूच आहे. गुरुवारी येथून विशेष ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
  • देशात शुक्रवारी 227 जणांचा मृत्यू

देशातील कोरोना संक्रमणामुळे मरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील अर्ध्यापेक्षा म्हणजे 63.45% मृत्यू फक्त 16 शहरात झाले आहेत. या 16 शहरात 50 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. या यादीत महाराष्ट्रातील 8 शहरे मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, रायगड, सोलापूर आणि जळगाव आहेत. तसेच, मध्य प्रदेशातील इंदुर, भोपाळ आणि उज्जैन आहेत आणि गुजरातमधील अहमदाबाद आणि सूरत सामील आहेत.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 33 हजार 789 झाली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी 2,436 नवीन रुग्ण सापडले. यासोबत तमिळनाडूत 1438, कर्नाटक 515, गुजरात 510, उत्तरप्रदेश 496, प. बंगाल 427, आंध्रप्रदेश 138, ओडिशा 130, केरळ 111, हरियाणा 103, बिहार 99 आणि राजस्थानमध्ये 68 रुग्ण सापडेल. ही आकडेवारी Covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 2 लाख 26 हजार 770 संक्रमित आहेत. यातील1 लाख 10 हजार 960 अॅक्टिव केस केस असून, 1 लाख 9 हजार 462 ठीक झाले आहेत. तर, 6348 मृत्यू झाले आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने शुक्रवारी सांगितले की, 4 जून रोजी 1 लाख 39 हजार 458 टेस्ट झाल्या. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. याआधी 2 जून रोजी 1 लाख 37 हजार 158 चाचण्या झाल्या होत्या. तर 1 जून रोजी 1 लाख 28 हजार 868 चाचण्या करण्यात आल्या. अशाप्रकारे आतापर्यंत 43 लाख 86 हजार 376 चाचण्या झाल्या आहेत. कोरोना अपडेट्स 

  • दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (डीएमआरसी) चे 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. सर्वांना कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आहेत.
  • ओडिशात एका महिलेने श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये मुलाला जन्म दिला. ही रेल्वे तेलंगाणाहून ओडिशाकडे जात होती. आई आणि बाळाची प्रकृती चांगली असल्याचे रेल्वेने सांगितले.
  • संरक्षण संशोधन व विकास संघटनेतील (डीएडीओ) एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दिल्ली येथील मुख्यालयातील एक मजला सॅनिटायझेशनसाठी बंद केला आहे.
  • मागील 24 तासांत महाराष्ट्रात 4 पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात एकूण 2,561 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यातील 31 जणांचा कोरोनाने बळी घेतला.
0