आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात कोरोनाचे नवे रुग्ण वाढल्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. सोमवारी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २० हजारांच्या पुढे जाईल. सुरुवातीचे १० हजार मृत्यू ८० दिवसांत, तर पुढील १० हजार मृत्यू केवळ २१ दिवसांत झाले.
३० मेपर्यंत देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण २.८% होते. २५ जून रोजी ते ३.९% झाले. त्यानंतर मृत्यू रोखण्यात काही प्रमाणात यश मिळाले. परंतु आता अमेरिका आणि ब्राझीलने भारताला मागे टाकले आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या अमेरिकेत दर १०० रुग्णांपैकी ६ जण मृत्युमुखी पडत होते. आता १०० पैकी केवळ १ रुग्णाचा मृत्यू होत आहे. अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेेल्या ब्राझीलमधील मृत्यूचे प्रमाण निम्मे आहे. पूर्वी तेथे मृत्युदर ५.८% होता. आता २.६% आहे. भारतात सर्वाधिक ६,३०९ मृत्यू महाराष्ट्रात, तर २,४८१ दिल्लीत आहेत. दरम्यान, रविवारी भारतात २५,६६२ रुग्ण आढळले. आता एकूण रुग्ण ६,९०,३४९ झाले आहेत. रुग्णांच्या बाबतीत भारताने रशियाला मागे टाकले. तेथे ६,८१,२५१ रुग्ण आहेत. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक रुग्ण असलेला देश आहे.
ब्राझीलने भारताला मागे टाकले आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या अमेरिकेत दर १०० रुग्णांपैकी ६ जण मृत्युमुखी पडत होते. आता १०० पैकी केवळ १ रुग्णाचा मृत्यू होत आहे. अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेेल्या ब्राझीलमधील मृत्यूचे प्रमाण निम्मे आहे. पूर्वी तेथे मृत्युदर ५.८% होता. आता २.६% आहे. भारतात सर्वाधिक ६,३०९ मृत्यू महाराष्ट्रात, तर २,४८१ दिल्लीत आहेत. दरम्यान, रविवारी भारतात २५,६६२ रुग्ण आढळले. आता एकूण रुग्ण ६,९०,३४९ झाले आहेत. रुग्णांच्या बाबतीत भारताने रशियाला मागे टाकले. तेथे ६,८१,२५१ रुग्ण आहेत. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक रुग्ण असलेला देश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.