आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 6 June LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात काेराेना:रुग्णसंख्या 2 लाख 43 हजार 904 वर; सहा दिवसात कोरोना चाचण्यांसाठी 66 ननवीन लॅब सुरू, यात दररोज 10 हजार जास्त सँपलचे परीक्षण होते

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2.28 लाख कोरोना रुग्णांसह भारतात संख्या आता इटलीच्या जवळ,

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 2 लाख 43 हजार 904 झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, लॉकडाउन उघडल्यानंतर केंद्र सरकारने कोरोनाशी सामना करण्यासाठी वेग पकडला आहे. मागील 6 दिवसात कोरोना चाचण्यांसाठी 66 नवीन लॅब उघडण्यात आल्या आहेत. यात 48 सरकारी आणि 18 खासगी लॅब आहेत. आता यात दररोज 10 हजारांपेक्षा जास्त सँपलचे परीक्षण होत आहे. आरोग्य मंत्रालयानुसार मागील 24 तासात 1 लाख 37 हजार 938 सँपलचे परीक्षण झाले आहे. आतापर्यंत देशात 45 लाख 24 हजार 317 लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयने शनिवारी कोरोनाची आकडेवारी जारी केली. यानुसार, मागील 24 तासात 9,887 रुग्ण सापडले आहेत. तर, 294 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान, संक्रमितांचा आकडा 2 लाख 37 हजार 395 झाला आहे. यातील 1 लाख 15 हजार 942 अॅक्टिव केसेस आहेत. एक लाख 14 हजार 073 ठीक झाले आहेत. तर, 6 हजार 642 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारत इटलीपेक्षा पुढे

या आकडेवारीसोबतच भारताने इटलीला मागे टाकले आहे. भारत आता सहाव्या आणि इटली सातव्या नंबरवर गेला आहे. भारतात शनिवारी सकाळपर्यंत 2 लाख 36 हजार 184 रुग्ण होते. तर, इटलीत 2 लाख 34 हजार 531 होते. परंतू, मृत्यूबाबतीत इटली भारतापेक्षा खूप पुढे आहे. तिथे आतापर्यंत 33 हजार 774 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिव्य मराठी आवाहन

देशाने आता अनलॉक-१ मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे बाजारात किंवा ऑफिसला जाताना मास्क घालूनच बाहेर पडा. फिजिकल डिस्टन्सचे तत्त्व पाळा. वारंवार हात धुवायला विसरू नका. गर्दीपासून दूरच राहा. अत्यावश्यक नसेल तर ज्येष्ठ नागरिक व १० वर्षांच्या आतील मुलांनी घरीच राहावे.

बातम्या आणखी आहेत...