आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 50 हजार 319 झाली आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्रानंतर तमिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 31 हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. एक आठवड्यापासून दररोज एक ते दीड हजार रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. रविवारी विक्रमी 1515 रुग्ण आढळले. मुख्यमंत्री पलानीसामी यांनी सांगितले की, तमिळनाडूतील एकूण संक्रमितांपैकी 86% रुग्णांमध्ये कोरोनाचे कोणतीही लक्षणे दिसली नाहीत.
ते म्हणाले की, राज्य सरकारने 4 जून पर्यंत 5.50 लाख चाचण्या केल्या. तमिळनाडूतील रुग्णांचा रिकव्हरी रेट देशात सर्वाधिक आणि मृत्यूदर जगातील अनेक देशांपेक्षा कमी आहे. राज्यात 16 हजार 999 रुग्ण बरे झाले असून 272 जणांचा मृत्यू झाला आहे.
भारत 4 दिवसांत ब्रिटनला मागे टाकेल
देशात संक्रमणात वेगाने वाढ होत आहे. मागील सहा दिवसात भारतात 56 हजार 121 रुग्ण वाढले आहेत. जर हाच वेग राहिल्यास भारत पुढील चार दिवसात ब्रिटेनला मागे टाकेल आणि पाचव्या नंबरवर येईल. worldometers वेबसाइटनुसार, ब्रिटेनमध्ये रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 2 लाख 84 हजार 868 रुग्ण आहेत. सध्या ब्रिटेन सर्वात जास्त संक्रमित देशांच्या यादीत पाचव्या नंबरवर आहे. तर, भारतात 2 लाख 47 हजार 40 रुग्ण आहेत. भारतापेक्षा ब्रिटेन 37 हजार 828 रुग्णांनी पुढे आहे. भारताने दोन दिवसांपूर्वी इटलीला मागे टाकले आहे. ब्रिटेनमध्ये आतापर्यंत 40,465 मृत्यू झाले आहेत. तर, भारतात 6,950य
महाराष्ट्रात 20 हजारांपेक्षा जास्त कैदी सोडले
ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील 60 तुरुंगातील 11 हजार कैद्यांना इमरजन्सी पेरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला. याआधीही 9671 कैद्यांना सोडले होते. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितले की, राज्यातील कारागृहांत एकूण 38 हजार कैदी आहे. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी यातील 20 हजार कैदी बाहेर येऊ शकतात. याशिवाय 24 जिल्ह्यांच 31 तात्पुरते कारागृह उभारले आहेत.
कोरोना अपडेट्स
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.