आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 8 July News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:मागील 24 तासांत 23,135 रुग्णांची वाढ, देशात आतापर्यंत 7.44 लाख केस; तर 20 हजार 653 मृत्यू

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकरने मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा डोनेशनची सुविधा लॉन्च केली
  • रेमेडीसवीर औषधाच्या काळ्या बाजारावर केंद्र सरकारचे कठोर पाऊल, राज्यांना बंदी घालण्याचे आदेश

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 44 हजार 10 झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे. यादरम्यान महाराष्ट्रात आजपासून 33% कर्मचाऱ्यांसोबत लॉज आणि हॉटेल सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.  त्याचबरोबर, येथे राहणाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान रेस्टॉरंट्सवरील बंदी अद्याप कायम राहील.

दुसरीकडे केंद्र सरकारने संक्रमित रुग्णांच्या उपचारात उपयुक्त रेमडेसिविर औषधाचा काळा बाजाराच्या तक्रारींना गांभीर्याणे घेतले आहे. सरकारने मंगळवारी राज्यांना सांगितले की, सर्व रूग्णालयात रेमेड्सवीर औषधाचा योग्य दरात पुरवठा करावा.

कोरोना अपडेट्स
 

  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने बुधवारी सांगितले की, आतापर्यंत देशात 1 कोटी 4 लाख 73 हजार 771 चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी 2 लाख 62 हजार 679 सँपल्सीच 7 जुलै रोजी टेस्ट करण्यात आली. 
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी आपली आकडेवारी जारी केली. यानुसार, मागील 24 तासांत 22 हजार 751 प्रकरणे समोर आली. तर 482 मृत्यू झाले. यासोबत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 42 हजार 417 झाला आहे. यांपैकी 2 लाख 64 हजार 944 अॅक्टिव्ह केस आहेत आणि 4 लाख 56 हजार 831 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 20 हजार 642 लोकांचा मृत्यू झाला आहे. 
  • गुजरात उच्च न्यायालय 10 जुलैपर्यंत बंद राहणार आहे. मागील दोन दिवसांत येथे 6 कर्मचारी संक्रमित आढळले. न्यायालयाच्या परिसरात सॅनिटायझेशनचे काम चालू आहे. 
0