आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases 8 June LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:आतापर्यंत 2.62 लाख रुग्ण: मुंबईतील संक्रमितांचा आंकडा 50 हजारांच्या पुढे,बंगाल-मिजोरमने लॉकडाउन वाढवला

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो राजस्थानमधील अजमेरचा आहे. कोरोना काळात मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या महिला आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आहेत - Divya Marathi
फोटो राजस्थानमधील अजमेरचा आहे. कोरोना काळात मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या महिला आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आहेत
  • देशात कोरोनामुळे आतापर्यंत 7207 मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक 3060 जणांचा गेला बळी

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 2 लाख 62 हजार 646 झाला आहे. सोमवारी महाराष्ट्रात 2,553 नवीन रुग्ण सापडले तर 109 मृत्यू झाले. आतापर्यंत मुंबईतील संक्रमितांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला आहे, तर शहरातील मृतांची संख्या 702 झाली आहे. आतापर्यंत राज्यात 88 हजार 528 रुग्ण झाले असून, 40 हजारांपेक्षा जास्त ठीक झाले आहेत.

बंगाल आणि मिझोरमने लॉकडाउन 30 जून पर्यंत वाढवला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 57 हजार 486 वर पोहचला आहे. रविवारी विक्रमी 10 हजार 884 रुग्ण वाढले. एक दिवस आधी शनिवारी देखील 10 हजार 408 प्रकरणे समोर आली होती. महाराष्ट्रात 3 हजार 7 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यासोबत राज्यातील संक्रमितांची संख्या 85 हजार 975 झाली आहे. याबाबतीत महाराष्ट्राने चीनलाही मागे टाकले आहे. चीनमध्ये 83 हजार 43 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील संक्रमितांचा दर कमी झाल्याचे समोर आले आहे.

75 दिवसांनंतर उघडले धार्मिक स्थळे

लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात 24 मार्चपासून बंद केलेली धार्मिक स्थळे देशभरात आजपासून उघडण्यात आली. दिल्लीत चांदनी चौक येथील गौरी शंकर मंदीर आणि कालका जी मंदिरात सकाळी भाविकांनी प्रार्थना केली. दुसरीकडे लखनऊमध्ये ईदगाह मशीदीत नमाज पठण करण्यात आले. या ठिकाणांवर केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात आले. 

अपडेट्स...

दिल्लीत पीआयबी अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामुळे नॅशनल मीडिया सेंटर सॅनिटायझेशनसाठी सोमवारी बंद राहणार आहे. 

महाराष्ट्रातील 60 तुरुंगातून 11 हजार कैद्यांना इमरजन्सी पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी 9671 कैद्यांना सोडले होते. राज्यातील कारागृहात 38 हजार कैदी आहेत. 

रुग्णांच्या संख्येत तामिळनाडू दुसर्‍या क्रमांकावर आहे. येथे आतापर्यंत 31 हजारांपेक्षा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रविवारी विक्रमी 1515 रुग्ण सापडले. येथील 86% रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाही. 

बातम्या आणखी आहेत...