आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 2 लाख 68 हजार 015 झाला आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांना रविवारी सौम्य ताप आणि गळ्यात इनफेक्शनचा त्रास झाला होता. मुख्यमंत्री सोमवारापासून सेल्फ क्वारेंटाइन आहेत.
दिल्ली सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, एलजी अनिल बैजल आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची दिल्लीतील कोरोना परिस्थितीवर बैठक पार पडली. यानंतर सिसोदिया यांनी सांगितले की, 31 जुलैपर्यंत दिल्लीतील संक्रमितांचा आखडा साडेपाच लाखांच्या पुढे जाईल. कम्युनिटी ट्रांसमिशन सुरू झाल्याचे केंद्र स्विकारत नाही, पण दिल्ली सरकारचे म्हणने आहे की, दिल्लीत कम्युनिटी ट्रांसमिशन सुरू झाले आहे.
दिल्ली सरकारचा अंदाज आहे की, 15 जूनपर्यंत दिल्लीत 44 हजार रुग्ण होतील आणि 6, 600 बेडची गरज पडेल. तर, 30 जूनपर्यंत दिल्लीत 1 लाखांपेक्षा जास्त रुग्ण होती आणि 15,000 खाटांची गरज पडेल. तसेच, 15 जुलैपर्यंत 2.25 लाख आणि 31 जुलैपर्यंत 5.5 लाख रुग्ण होऊन, 81,000 बेडची गरज पडेल. यापूर्वी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनीदेखील दिल्लीत कम्यूनिटी ट्रांसमिशन होत असल्याचे म्हटले होते. ते मंगळवारी म्हटले होते की, दिल्लीमध्ये कोरोनाचा कम्यूनिटी स्प्रेड होत आहे. या नवीन रुग्णांमध्ये कोरोनाचा सोर्स सापडत नाहीये.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी आपले आकडे जारी केले. यानुसार मागील 24 तासात 9 हजार 987 रुग्ण सापडले आणि 331 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच, देशातील रुग्णसंख्या 2 लाख 66 हजार 598 झाली आहे. यातील 1 लाख 29 हजार 917 अॅक्टिव्ह केस आहे आणि 1 लाख 29 हजार 215 कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात 7 हजार 466 मृत्यू झाले आहेत.
कोरोना अपडेट्स...
24 हजार नमुन्यांच्या तपासणीनंतर आयसीएमआरचा अहवाल
आयसीएमआरने देशभरातील २०० कंटेनमेंट झोनमध्ये सर्व्हे केला होता. यापैकी ५० कंटेनमेंट झोनचा अहवाल सरकारला मिळाला आहे. एका माध्यमाच्या वृत्तानुसार, कंटेनमेंट झोनमधील १५ ते ३०% लोक शक्यतो कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या तडाख्यात सापडले आहेत. विशेष म्हणजे, हे रुग्ण आता बरेही झाले आहेत. फक्त गंभीर रुग्णच रुग्णालयांत पोहोचले. इतरांना ते कधी काेरोनाबाधित झाले अन् कधी बरे झाले, हेही माहीत नाही. मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद व इंदूरच्या कंटेनमेंट झोनमधील संसर्गाचा फैलाव हा इतर कंटेनमेंट झोनच्या तुलनेत १०० पटींनी जास्त आहे. आयसीएमआरने निरोगी दिसणाऱ्या २४ हजार लोकांचे नमुने घेतले होते. पैकी १५ ते ३०% लोकांच्या शरीरात अँटिबॉडी विकसित झाली होती.
जेवढे रुग्ण नोंद झाले, त्याच्या २०० पट बाधितांचा पत्ताच लागला नाही
सर्व्हेशी संबंधित अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे की, सुरत, कोलकात्यासह ६ जिल्ह्यांतील कंटेनमेंट झोनमधून ५००-५०० नमुने घेतले होते. या भागात जेवढे रुग्ण नोंदवण्यात आले, त्याच्या २०० पट लोक बाधित झाले आहेत. त्यांच्यात कुठलीही लक्षणे नसल्याने त्यांना आपण बाधित आहोत, हेही कळले नाही. जवळपास सर्वच कंटेनमेंट झोनमध्ये सारखी परिस्थिती आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.