आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Death 22 July News And Updates; Maharashtra Mumbai Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Telangana Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:एकूण रुग्णांचा आकडा 12 लाखांच्या पुढे; यापैकी 7.72 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 12 लाख 20 हजार 433 झाला आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत आलेल्या माहितीनुसार, देशभरात 26,350 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली, तर 761 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच देशातील एकूण मृतांचा आकडा 29,531 च्या पुढे गेला आहे. तसेच, बुधवारी तब्बल 21 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना ठीक झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशभात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 4 लाख 18 हजार असून, 7 लाख 72 हजार 488 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

दिल्लीत दर महिन्याला सीरो सर्वे होईल

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतू, दर पाचपैकी एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळत आहे. याच पार्श्वभूमिवर दिल्लीत दर महिन्याला सीरोलॉजिकल सर्वे केला जाईल. दर महिन्याच्या एक ते पाच तारखेमध्ये शहरातील निवडक भागात अँटीबॉडी टेस्ट केला जाईल. नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल आणि दिल्ली सरकारच्या सीरो सर्वेनुसार, 22.86% लोकांमध्ये अँटीबॉडिज मिळाल्या आहेत. 27 जून ते 10 जुलैदरम्यान हा सर्वे झाला हगोता.

दुसरीकडे आंध्रप्रदेश सरकार 5 सप्टेंबरपासून शाळा सुरु करण्याची योजना आखत आहे. सरकारने म्हटले की, एक सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्यात येईल. त्यावेळी कोरोनाची परिस्थिती कशी आहे ते पाहिले जाईल, असेही सरकारने म्हटले.