आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ईडीने तब्लीगी जमात प्रमुख मौलाना सादविरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केली आहे. यापूर्वी मौलानाविरोधात दाखल एफआयआरमध्ये सरकारी वकीलाच्या सल्ल्यानुसार सदोष मुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता मौलाना सादला जामीन मिळू शकणार नाही. दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
कोरोनाव्हायरसच्या देशात वाढत्या उद्रेक दरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे. चीनच्या गुआंगझो येथून साडेसहा लाख टेस्ट किट घेऊन विशेष विमान दिल्लीकडे रवाना झाले आहे. यातील साडेपाच लाख रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट आहेत. रॅपिड किटद्वारे तपासणी केल्यास, अवघ्या 15 मिनिटांत रुग्णाच्या संसर्गाची तपासणी होऊ शकते. रक्ताच्या एका थेंबाद्वारे ही तपासणी केली जाते. देशात सध्या केल्या जात असलेल्या तपासणीत गळा किंवा नाकातून स्वॅबचे सँपल घेतले जातात. याद्वारे रिपोर्ट येण्यास किमान 5 तास लागतात.
काल रुग्णांच्या संख्येत थोडीशी घसरण झाली
देशात आज (गुरुवार) 660 कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यात महाराष्ट्र 165, मध्यप्रदेश 182, राजस्थान 28, उत्तरप्रदेश 38, गुजरात 105 आणि बिहार 8 रुग्ण आढळले. बुधवारी दिवसभरात 882 कोरोनाग्रस्त आढळले होते. याआधी सोमवारी 1 हजार 242 आणि मंगळवारी 1 हजार 35 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या महिन्याच्या 15 दिवसांत देशात कोरोना संक्रमणाची संख्या 6 पट वाढली आहे. 1 एप्रिल रोजी 2 हजार 59 संक्रमित होते. आज ती संख्या 13 हजार 31 झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांच्या आकडेवारीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत देशभरात 12 हजार 380 संक्रमित आहेत. यातील 10 हजार 477 जणांवर उपचार सुरू आहेत. 1 हजार 488 लोक बरे झाले तर 414 लोकांचा मृत्यू झाला आहे.
27 राज्य आणि 7 केंद्र शासित प्रदेशांत कोरोनाचा फैलाव
आतापर्यंत देशातील 27 राज्यांत कोरोनाने आपले पाय पसरवले आहे. तर देशातील 7 केंद्र शासित प्रदेशांतही संसर्ग फैलावला आहे. यामध्ये दिल्ली, चंडीगड, अंदमान-निकोबार, दादरा आणि नगर हवेली, जम्मू-काश्मिर, लडाख आणि पद्दुचेरीचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.