आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात कोरोना:आतापर्यंत 8 हजार 228 प्रकरणे: केंद्रीय मंत्री सोमवारपासून कामकाज सांभाळू शकतात, लॉकडाउननंतर आर्थिक परिस्थिती हाताळण्यावर भर देतील

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीः हवाई दलामार्फत देशाच्या विविध ठिकाणी जीवनावश्यक सामुग्री पाठवली जात आहे - Divya Marathi
दिल्लीः हवाई दलामार्फत देशाच्या विविध ठिकाणी जीवनावश्यक सामुग्री पाठवली जात आहे
  • भारत हे औषध अमेरिकेसह 13 देशांमध्ये निर्यात करणार

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत देशभरातील संक्रमितांची संख्या 8 हजार 228 झाली आहे. आज देशभरात 629 नवीन रुग्ण आढळले. महाराष्ट्रात सर्वाधिक 1761 रुग्ण आहेत तर दिल्लीत 1069 पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने सर्व मंत्र्यांना सोमवारपासून पदभार स्वीकारण्यास सांगितले असून लॉकडाऊन संपल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याची योजना तयार करण्यास सांगितले आहे. सुत्रांनुसार, सरकारने सर्व मंत्रालयांना आपल्या विभागाचे संयुक्त सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामकाज स्वीकारण्यास आणि विभागात एक तृतीयंश कर्मचारी वर्ग बोलावण्यास सांगतिले आहे. 

शनिवारी दिल्लीत 166, राजस्थानात 117, गुजरातमध्ये 90 नवीन कोरोनाग्रस्त आढळले. तर कर्नाटकात 8, झारखंडमध्ये 3, मध्यप्रदेशात 2, हरियाणात 3 आणि बिहारमध्ये 1 प्रकरण समोर आले. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइट आणि राज्य सरकारांच्या आकडेवारीनुसार आहे. तर आरोग्य मंत्रालयानुसार, शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत देशात 7 हजार 529 संक्रमित आहेत. यातील 6 हजार 634 रुग्णांवर उपचार सुरू आहे. यातील 652 रुग्ण बरे झाले तर 242 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये लॉकडाउन वाढला

देशातील चार राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल सरकारने शनिवारी लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. तर पंजाब आणि ओडिशाने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय शुक्रवारीच घेतला होता. दुसरीकडे केंद्र सरकार सुद्धा लॉकडाऊन देशभरात दोन आठवड्यांसाठी वाढवू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांसोबत सुमारे 4 तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या बैठकीनंतर लगेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केले की, ''पंतप्रधानांनी लॉकडाऊन वाढविण्याचा योग्य निर्णय घेतला आहे''.

सरकार म्हटले - लॉकडाउन नसते तर 45 हजार प्रकरणे झाली असती

केंद्रीय मंत्रालयांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शनिवारी असे सांगितले गेले की देशात संक्रमणाची 7 हजार 447 प्रकरणे आहेत. लॉकडाउन नसते  तर ही संख्या जवळपास 45 हजारांच्या आसपास गेली असती. प्रयत्न झाले नसते तर 2 लाख प्रकरणे झाली असती. यामुळे लॉकडाउन गरजेचे होते. गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना डॉक्टर आणि आरोग्य कामगारांना संरक्षण देण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...