आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 02 November 2020 LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:एकूण रुग्णसंख्या 82 लाख पार; सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कमी मृत्यू; संक्रमणाचा वेगही मंदावला

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्ली आणि केरळमधील वाढत्या रुग्णसंख्येने वाढवली चिंता

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 82 लाख पार झाला आहे. आतापर्यंत 82 लाख 29 हजार 322 लोक पॉझिटिव्ह आढळले. यातील 5 लाख 62 हजार 455 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 75 लाख 42 हजार 905 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 22 हजार 642 रुग्णांचा मृत्यू झाला.

दोन महिन्यांच्या डेटाचे विश्लेषण केल्यास सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये संक्रमणाचा वेग, मृत्यू आणि रिकव्हरी तिघांमध्ये घसरण पाहायला मिळाली. ऑक्टोबरमध्ये 71.61% संक्रमणाची प्रकरणे कमी झाली तर मृत्यूंमध्ये 70.57%ची घसरण झाली आहे. अशाप्रकारे रिकव्हरी रुग्णांमध्येही 20.63% ची घसरण नोंद झाली आहे.

केरळमध्ये 112% वाढ झाली

केरळ आणि दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या चिता वाढवत आहेत. मागील महिन्यात केरळमध्ये 112% वाढ झाली आहे. येथे 1 ऑक्टोबर रोजी रुग्णसंख्या 2 लाख 4 हजार 242 होती, ती 31 ऑक्टोबर रोजी वाढून 4 लाख 33 हजार 106 झाली आहे. अशाप्रकारे दिल्लीत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात येथे 2 ते 3 हजार नवीन रुग्ण वाढत होते, आता येथे 4 ते 5 हजार रुग्ण वाढत आहेत. येथे ऑक्टोबरमध्ये 36% रुग्ण वाढले आहेत.