आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 03 August News And Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Amit Shh Tested Positive

देशात कोरोना:कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह, काल येदियुरप्पांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता; आतापर्यंत 18.52 लाख प्रकरणे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांच्या मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना बंगळुरूच्या मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचा रिपोर्ट रविवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला होता. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

येदियुरप्पा यांनी रविवारी ट्विट करून ही माहिती दिली होती. ते म्हणाले की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून मी ठीक आहे. गृहमंत्री अमित शाह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना गुडगावच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यादरम्यान देशातील कोरोनाबाधितांची संख्या रविवारी 18.52 लाख पार झाली. आता देशात 18 लाख 52 हजार 156 लोक संक्रमित झाले आहेत. यातील 12,29,171 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

बातम्या आणखी आहेत...