आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 03 November 2020 LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 76 लाख पार, वुहानला गेलेल्या वंदे मातरम विमानातील 19 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो दिल्ली रेल्वे स्टेशनचा आहे. येथे पीपीई किटमध्ये बसलेली एक महिला प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पहात आहे. दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
  • देशात सध्या 5 लाख 40 हजार 883 अॅक्टीव्ह रुग्ण, रिकव्हरी रेट 92%

देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 76 लाख पार झाली आहे. आतापर्यंत 76 लाख 1 हजार 429 रुग्ण कोरोनातून बरे झाले. यासोबतच रिकव्हरी रेटमध्ये 1% वाढ होऊन तो 92% झाला आहे. मागील 24 तासांत 58 हजार 524 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

संक्रमितांच्या संख्येवर नजर टाकल्यास 82 लाख 66 हजार 914 लोक आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यातील 5 लाख 40 हजार 883 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 23 हजार 139 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वुहानला गेलेले 19 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना संकटादरम्यान भारतातून चीनच्या वुहान शहरात गेलेले विमानातील 19 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 30 ऑक्टोबर रोजी हे विमान वंदे भारत मिशनअंतर्गत गेले होते. विमानातील एकूण 277 प्रवाशांपैकी 39 प्रवाशांमध्ये अँटीबॉडी देखील मिळाल्या आहेत. अशात सर्व 58 प्रवाशांना कोविड-19 रुग्णालये आणि क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल केले आहे. इतर सर्व प्रवाशांना 14 दिवसांपर्यंत वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

एअर इंडियाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. यानुसार विमानातील सर्व प्रवाशांजवळ कोरोना टेस्टिंगचे निगेटिव्ह रिपोर्ट होते. एका प्रमाणित प्रयोगशाळेतील हे रिपोर्ट होते. तसेच विमानात कोविड-19 च्या प्रोटोकॉलची काळजी घेतली होती.