आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 09 November 2020 LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

देशात कोरोना:बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 79 लाख पार, 24 तासांत दिल्लीत विक्रमी रुग्ण वाढले

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो देशाची राजधानी दिल्लीचा आहे. कोरोनाची तिसरी लाट येथे सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत एक कलाकार जागृकतेसाठी वॉल पेंटिंग करताना. - Divya Marathi
फोटो देशाची राजधानी दिल्लीचा आहे. कोरोनाची तिसरी लाट येथे सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत एक कलाकार जागृकतेसाठी वॉल पेंटिंग करताना.
  • देशातील एकूण रुग्णसंख्या 85.53 लाख पार, आतापर्यंत 1.26 लाख रुग्णांचा मृत्यू

देशातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 79 लाख पार झाली आहे. आतापर्यंत 79 लाख 15 हजार 660 रुग्णांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर देशातील एकूण रुग्णसंख्या 85 लाख 53 हजार 816 झाली आहे. देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 26 हजार 653 लोकांचा मृत्यू झाला आहे.

यादरम्यान दिल्लीसह 11 राज्यांतील अॅक्टीव्ह रुग्णांमध्ये रविवारी वाढ झाली. देशाची राजधानी दिल्लीत सर्वात बिकट परिस्थिती आहे. मागील 24 तासांत येथे विक्रमी 7745 लोक पॉझिटिव्ह आढळले.

आतापर्यंत एका दिवसात रुग्ण आढळणारा हा आकडा सर्वाधिक आहे. यासोबत दिल्लीतील एकूण रुग्णसंख्या 4 लाख 38 हजार 529 झाली आहे. यातील 3 लाख 683 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 41 हजार 857 रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिल्लीत कोरोनामुळे आतापर्यंत 6989 लोकांचा मृत्यू झाला आहे.

या राज्यांमध्ये वाढले अॅक्टीव्ह रुग्ण

रविवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, राजस्थान, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, पंजाब, मेघालय आणि चंढीगडमध्ये अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली.

बातम्या आणखी आहेत...