आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 1 November 2020 LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Kerala Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:तमिळनाडूच्या कृषी मंत्र्यांचे कोरोनामुळे निधन; प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे रुग्ण आढळण्याचा वेग 6 हजारांपेक्षा कमी, एकूण रुग्णसंख्या 81.82 लाख पार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1.22 लाख रुग्णांचा मृत्यू
  • केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या कुटुंबातील 6 सदस्यांना कोरोनाची लागण

तमिळनाडूचे कृषी मंत्री आर दोराइक्कन्नू यांना शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाची पुष्टी झाल्यानंतर 72 वर्षीय दोराइक्कन्नू यांना 13 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल केले होते. मागील 2 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवले होते, शनिवारी रात्री 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

दुसरीकडे देशात प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे कोरोना रुग्ण मिळण्याचा वेग घसरून 6 हजारांपेक्षा कमी झाला आहे. आता 10 लाख लोकसंख्येमागे 5,908 नवीन रुग्ण आढळत आहेत. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हा आकडा 7-8 हजारापर्यंत पोहोचला होता.

या दरम्यान देशात कोरोना चाचण्यांची संख्या 11 कोटींजवळ पोहोचली आहे. आतापर्यंत 10 कोटी 90 लाखांपेक्षा जास्त लोकांची चाचणी करण्यात आली. यापैकी 81 लाख 82 हजार 881 लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 74 लाख 89 हजार 230 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 22 हजार 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात अनेक दिवसांनंतर मृत्यूचा आलेख खाली आला

महाराष्ट्रात अनेक दिवसांनंतर मृत्यूचा आलेखात जबरदस्त घसरण दिसून आली. शनिवारी सुमारे 6 महिन्यांनंतर 74 रुग्णांचा मृत्यू झाला. याआधी 1 जून रोजी 79 लोकांचा मृत्यू झाला होता.

केंद्रीय मंत्री गंगवार यांची पत्नी आणि 6 कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह

केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांची पत्नी आणि कुटुंबातील 6 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गंगवार यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. दरम्यान गंगवार यांनी देखील कोरोनाची चाचणी केली होती, मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. गंगवार यांनी सांगितले की त्याचे कुटुंब नुकतेच दिल्ली येथे गेले होते, तेथे त्यांना संसर्ग झाला. सर्वांना फरीदाबादच्या ESI रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.