आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 10 August 2020 News And Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:रविवारी 62 हजार 117 रुग्णांची वाढ, तर सर्वाधिक 1 हजार 92 मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 22 लाख पार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामिळनाडूमध्ये सोमवारपासून जिम उघडण्यात आल्या आहेत.
  • देशात सध्या 6 लाख 34 हजार 945 अॅक्टीव्ह रुग्ण, आतापर्यंत 44 हजार 386 लोकांचा बळी

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 22 लाख पार झाली आहे. आतापर्यंत 22 लाख 15 हजार 405 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रविवारी 62 हजार 117 नवीन रुग्णांची वाढ झाली. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी आकडेवारी जारी केली. यानुसार, रविवारी दिवसभरात 62 हजार 64 रुग्ण आढळले आणि 1 हजार 7 लोकांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 22 लाख 15 हजार 75 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी 6 लाख 34 हजार 945 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत आणि 15 लाख 35 हजार 744 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशात कोरोनामुळे आतापर्यंत 44 हजार 386 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2 कोटी पार झाली आहे. 50 लाख रुग्ण फक्त 20 दिवसांत वाढले. यातील 9.72 लाख (19.44%) भारतातील आहेत. सध्या जगातील एकूण रुग्णांपैकी 11% रुग्ण भारतात आहेत. मागील आठवड्याच्या सरासरीकडे पाहता जगातील 63% नवीन रुग्ण फक्त भारत (24.82%), अमेरिका (20.64%) आणि ब्राझील (17.64%) मध्ये आढळले आहेत. म्हणजेच, जगातील एक चतुर्थांश रुग्ण आता फक्त भारतात सापडत आहेत. या तीन देशांना वगळता उर्वरित जगात केवळ 37% रुग्ण आढळले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे जगात 14 दिवसांपासून नवीन रुग्णांची सरासरी वाढली नाही. ब्राझील आणि अमेरिकेत नवीन रूग्णांची संख्या स्थिर झाली आहे, तर भारताची संख्या निरंतर वाढत असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे.