आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात कोरोना:दररोज होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत भारत टॉप-20 देशांतून बाहेर, महाराष्ट्र आणि गोवा वगळता इतर राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट 10% पेक्षा कमी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो मुंबईचा आहे. येथे लस घेतल्यानंतर फ्रेम पोझिशनमध्ये फोटो काढताना पोलिस कर्मचारी. - Divya Marathi
फोटो मुंबईचा आहे. येथे लस घेतल्यानंतर फ्रेम पोझिशनमध्ये फोटो काढताना पोलिस कर्मचारी.
  • देशातील एकूण रुग्णसंख्या 1.08 कोटीच्या पार, आतापर्यंत 1.05 कोटी कोरोनामुक्त
  • देशात सध्या 1.38 लाख रुग्णांवर उपचार सुरू

देशात सध्या महाराष्ट्र आणि गोवा वगळता इतर सर्व राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. याठिकाणी 100 लोकांची तपासणी केली असता 10 पेक्षा कमी संक्रमित आढळत आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 13.6% आणि गोव्यात 11.6% पॉझिटिव्हिटी रेट आहे.

आणखी एक चांगली बातमी अशी की कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत भारत जगातील टॉप-20 देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. आता भारत 22 व्या क्रमांकावर आहे. कोरोनामुळे मंगळवारी 77 लोकांचा मृत्यू झाला. हा सलग पाचवा दिवस होता जेव्हा देशात 100 पेक्षा कमी मृत्यू झाले. सध्या अमेरिका, ब्राझील आणि ब्रिटनमध्ये सर्वाधिक लोकांचा मृत्यू होत आहे. अमेरिकेत सोमवारी 3,265, ब्राझीलमध्ये 1,340 आणि ब्रिटनमध्ये 1,052 जणांचा मृत्यू झाला.

21 राज्ये-केंद्र शासित प्रदेशात राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी रुग्ण आढळताहेत

देशातील 21 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील पॉझिटिव्हिटी रेट राष्ट्रीय सरासरी 5.4% पेक्षा कमी आहे. यामध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, तमिळनाडू, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश यांसारख्या मोठ्या राज्यांचा समावेश आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकसह 13 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात 5.4% ते 10% पर्यंत पॉझिटिव्हिटी रेट आहे.

24 तासांत 10 हजार नवीन रुग्ण आढळले

मंगळवारी 10,510 नवीन रुग्ण आढळले. 12,699 बरे झाले आणि 85 जणांचा मृत्यू झाला. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1.08 कोटीच्या पार केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1.05 कोटी लोकांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 1.55 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 1.38 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

बातम्या आणखी आहेत...