आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 11 August 2020 News And Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 16 लाख पार, रिकव्हरी रेट 70% वर पोहोचला; देशात आजपर्यंत 22.93 लाख प्रकरणे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 45 हजार 592 रुग्णांचा बळी

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 22 लाख 93 हजार 265 झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे यामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मंगळवारी 16 लाख पार झाली. आतापर्यंत 16 लाख 2 हजार 693 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 70% झाला आहे. तर देशात कोरोनामुळे 45 हजार 592 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 6 लाख 44 हजार 265 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या दरम्यान एम्स नवी दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, जर रशियाने विकसित केलेली लस यशस्वी झाली तर आम्ही त्याची चाचणी करू. लसीपासून कोणता धोका आहे का यासाठी आम्ही गांभीर्याने ही चाचणी करू. जर ही लस सुरक्षित आणि प्रभावी ठरल्यास भारतामध्ये मोठ्या प्रमाणात औषध तयार करण्याची क्षमता आहे. परंतु यापूर्वी या लसीची शास्त्रोक्त पद्धतीने तपासणी केली जाईल.

मध्यप्रदेश काँग्रेस उपाध्यक्षांचा मृत्यू

मध्यप्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बृजमोहन परिहार (72) यांचे मंगळवारी सकाळी 4.30 वाजता कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी गुडगावच्या मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बृजमोहन यांनी रक्तदाब आणि साखरेचा आजार होता. ते एक महिन्यापासून आजारी होते. पाच दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते.

दिल्लीत एक तृतीयांश रुग्ण इतर राज्यातील - सत्येंद्र जैन

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, उपचारासाठी शेजारच्या राज्यातून आलेल्या रुग्णांमुळे दिल्लीतील कोरोना संख्येवर परिणाम झाला आहे. ते म्हणाले की, 'दिल्लीत शेजारील राज्यातील लोक मोठ्या संख्येने चाचणी करण्यासाठी येत आहेत. रुग्णालयात दाखल असलेले एक तृतीयांश रुग्ण बाहेरील राज्यातील आहेत. रविवारी दिल्लीबाहेरील 97 आणि 200 स्थानिक रुग्ण रुग्णालयात दाखल झाले.' दिल्लीत मंगळवारी सकाळपर्यंत 1 लाख 46 हजार 134 रुग्ण आहेत. यातील 1 लाख 31 हजार 657 रुग्ण बरे झाले असून सध्या फक्त 10 हजार 346 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत.

बातम्या आणखी आहेत...