आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 11 October News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

देशात कोरोना:एकूण रुग्णसंख्या 70 लाख पार; 24 तासांत 72 हजार रुग्ण आढळले, तर 906 मृत्यू, 86 हजार लोक कोरोनामुक्त सुद्धा झाले

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो महाराष्ट्रातील कराड जिल्ह्यातील आहे. कुटुंब आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी येथील कोरोना रूग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
  • देशात आतापर्यंत 1.08 लाख लोकांचा मृत्यू, 8.82 लाख रुग्णांवर उपचार सुरू

देशात कोरोना रुग्णांची संख्या शनिवारी 70 लाख पार झाली. मागील 24 तासांत 72 हजार 98 नवीन रुग्णांचे निदान झाले. देशातील एकूण रुग्णसंख्या 70 लाख 49 हजार 181 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे यातील 60 लाख 72 हजार 553 लोक बरे होऊन घरी परतले आहेत.

शनिवारी 86 हजार 712 लोकांनी डिस्चार्ज देण्यात आला आणि 906 जणांचा मृत्यू झाला. देशात सध्या 8 लाख 82 हजार 542 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर एकूण मृत्यूसंख्या 1 लाख 8 हजार 356 झाली आहे.

मागील 25 दिवसांतील आकडेवारी पाहिल्यास असे दिसते की नवीन रुग्ण आणि मृत्यूचे पीक संपली आहे. एका दिवसात सर्वाधिक उपचार घेतलेले आणि बरे होणारे रुग्णही याच काळात राहिले.

15 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 1238 मृत्यू झाले होते, 16 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 97 हजार 865 नवीन रुग्णांची नोंद झाली होती, 17 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 10 लाख 17 हजार 703 अॅक्टीव्ह रुग्ण होते तर 21 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 1 लाख 2 हजार 70 लोक कोरोनामुक्त झाले होते.

अॅक्टीव्ह रुग्ण घटून एक महिन्यापूर्वीतच्या स्थितीत पोहोचले

देशातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 8 लाख 82 हजार झाली आहे. याआधी 7 सप्टेंबर रोजी देखील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 8 लाख 82 हजारच होती.