आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 12 July News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:24 तासांत 27,754 रुग्ण वाढले, देशात आतापर्यंत 8.50 लाख केस; 19 हजार 981 लोक कोरोनामुक्त

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो मुंबईचा आहे. येथे रेड झोन भागात घरोघरी जाऊन नमुने घेण्यात येत आहेत.
  • देशात आतापर्यंत 22 हजार 687 मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक 10,116 बळी

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 8 लाख 50 हजार 358 झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी 27 हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले. मागील 24 तासांत 27 हजार 754 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर 19 हजार 981 लोक कोरोनामुक्त देखील झाले.  

शनिवारी महाराष्ट्रात सर्वाधिक 8139 लोक संक्रमित आढळले. हा आतापर्यंत सर्वात मोठा आकडा आहे. दुसरीकडे मुंबईत अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनला कोरोनाची लागण झाली. दोघांनाही मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नानावटीचे क्रिटिकल केअर सर्व्हिसेसचे संचालक डॉ. अब्दुल एस अन्सारी यांनी अमिताभची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे रात्री तीन वाजता माध्यमांना सांगितले.

0