आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 14 August 2020 News And Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना LIVE:देशातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 25 लाखांच्या पुढे: पहिले एक लाख रुग्ण व्हायला 110 दिवस लागले, तर 88 दिवसात वाढले 24 लाख रुग्ण

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांना कोरोनाची लागण

आपल्यासाठी एक वाईट बातमी आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा शुक्रवारी 25 लाखांच्या पुढे गेला आहे. चिंतेची बाब म्हणजे, दररोज मिळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत भारत इतर देशांच्या पुढे आहे. सध्या भारतात दररोज सरासरी 60 रुग्ण सापडत आहेत.

देशात 30 जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर 110 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी रुग्णसंख्या एक लाख झाली. परंतू, नंतर संक्रमणाने वेग पकडला आणि अवघ्या 88 दिवसात देशातील एकूण रुग्णांचा आकडा 25 लाखांच्या पुढे गेला. सध्या देशात 25,12,245 रुग्ण आहेत, तर 49 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 52,630 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली, तर 860 पेक्षा जास्त मृत्यू झाले. एकूण रुग्णांपैकी 17,39,250 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 6,66,503 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. लव अग्रवाल तेच अधिकारी आहेत, जे दररोज देशातील कोरोना परिस्थितीची माहिती देत होते. लव यांच्यावर आरोग्य मंत्रालयात ग्लोबल हेल्थ, मेंटल हेल्थ, टेक्नोलॉजी, पब्लिक पॉलिसीची जबाबदारी आहे.

दरम्यान, एक चांगली बातमी समोर आली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनावर मात केली आहे. दोन ऑगस्टला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांची रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी लिहीले की, ''आज माजी कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आली आहे. मी देवाला धन्यवाद देतो आणि माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्याने काही दिवस आयसोलेशनमध्ये असेल.''

केरळ विमान दुर्घटनेतील रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सामील 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. यात कलेक्टर आणि लोकल पोलिस ऑफिसर सामील आहेत. ही माहिती मलाप्पुरमच्या मेडिकल ऑफिसरने दिली. अपघात 7 ऑगस्टला कोझिकोड़ एअरपोर्टवर झाला होता. रनवेवर विमान घसरुन 35 फूट दरीत पडले होते आणि यात 18 जणांचा मृत्यू झाला होता, तर 149 जखमी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...