आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 15 November 2020 News And LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:24 तासांत 41 हजार नवीन रुग्णांची नोंद आणि 42 हजार बरे झाले, गेल्या 45 दिवसांत अॅक्टीव्ह रुग्णांत सर्वात कमी 1027 रुग्णांची घट

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
सणासुदीच्या काळात बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. या निमित्ताने दिल्लीत लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
  • देशातील एकूण रुग्णसंख्या 88.14 लाख, आजपर्यंत 1.29 लाख रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांत तेजीने होणारी घसरण दिवाळीच्या दिवशी कमी राहिली. शनिवारी 41 हजार 658 नवीन रुग्णांची नोंद झाली आणि तुलनेत केवळ 42 हजार 215 रुग्ण बरे झाले. तर 449 रुग्णांचा मृत्यू झाला. अशात अॅक्टिव्ह रुग्णांत, केवळ 1027 अॅक्टीव्ह रुग्ण कमी झाले. मागील 45 दिवसांत ही किमान संख्या आहे. 3 ऑक्टोबरपासून अॅक्टीव्ह रुग्णांमध्ये घट दिसून येत आहे.

देशातील एकूण रुग्णसंख्या 88.14 लाख झाली आहे. यातील 82.03 लाख रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1.29 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे.