आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली. ट्विट मध्ये म्हटले की, "समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र त्यांना कोरोनाची कोणतेही लक्षणे नाहीत."
समाजवादी पार्टी संस्थापक आदरणीय नेताजी श्री मुलायम सिंह यादव जी की कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आने के उपरांत चिकित्सकों की देख रेख जारी है।
— Samajwadi Party (@samajwadiparty) October 14, 2020
फिलहाल उनमें कोरोना के एक भी लक्षण नहीं हैं।
मीडिया रिपोर्ट्सनुसार मुलायम यांच्या पत्नी साधना गुप्ता यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र अद्याप याची पुष्टी झाली नाही. मुलायम सिंह यादव यांना सध्या गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील ट्विट केले आहे. ते म्हणाले की, "आम्ही वरिष्ठ डॉक्टरांच्या संपर्कात आहोत. सध्या मुलायम यांची प्रकृती स्थिर आहे."
26 ते 60 वर्षांच्या 45% रुग्णांचा मृत्यू
कोरोनाला हलक्यात घेणे युवा आणि कमी वयाच्या लोकांसाठी समस्या बनत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे कमी वय असलेल्या रुग्णांच्या मृत्यूत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत प्राण गमावलेल्या रूग्णांपैकी 45% रुग्ण 26 ते 60 वर्षे वयोगटातील होते.
याबाबत मंत्रालयाने तरुणांना इशारा दिला आहे. मंत्रालयाने म्हटले की, कोरोनामुळे केवळ वृद्ध लोकांचा मृत्यू होतोय असे आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. तरुण लोकांच्या मृत्यूंमध्येही आता वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. म्हणून आता सर्व वयोगटातील लोकांनी याबद्दल सावध राहण्याची गरज आहे.
आकडेवारीनुसार मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक 70% रुग्ण पुरुष होते, तर 30% रुग्ण महिला होत्या. यापैकी, मृत्यू झालेल्यांपैकी 53% रुग्ण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते.
रुग्णांचा आकडा 73 लाख पार
देशातील कोरोना रुग्णांची संख्या 73 लाख पार झाली आहे. आतापर्यंता 73 लाख 1 हजार 870 लोकांना कोरोनाची लागण झाली. यातील 8 लाख 12 हजार 548 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 63 लाख 76 हजार 919 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशभरात कोरोनामुळे 1 लाख 11 हजार 272 जणांचा मृत्यू झाला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.