आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 16 August News And Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:एकूण रुग्णसंख्या 26 लाखांच्या पुढे; रिकव्हरी रेट 72% तर मृत्यूदर 7% कमी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा रविवारी 26 लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत देशभरात 26 लाख 41 हजार 296 रुग्ण झाले आहेत. यात चांगली बाब म्हणजे, एकूण रुग्णांपैकी 19 लाख 11 हजार 292 रुग्ण ठीक झाले आहेत. तसेच, आतापर्यंत देसभरात 50 हजार 969 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 6 लाख 78 हजार 531 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात सर्वात जास्त अॅक्टीव्ह रुग्ण पुण्यात आहेत. शहरात आतापर्यंत 1 लाख 27 हजार 518 रुग्णांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. यातील 41,080 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर 83,308 रुग्ण ठीक झाले आहेत. तसेच, 3,130 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. यासोबतच, मुंबईत 1 लाख 27 हजार 716 रुग्णांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. यातील 17,581 रुग्णांवर उपचार सुरू असून, 1 लाख 02 हजार 749 रुग्ण ठीक झाले आहेत.

माजी क्रिकेटर आणि यूपी सरकारमधील मंत्री चेतन चौहान यांचा मृत्यू

माजी क्रिकेटर आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री चेतन चौहान (73) यांचे रविवारी निधन झाले. कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्यांना गुरुग्रामधील मेदांता हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. मागच्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उत्तर प्रदेश मंत्रीमंडळात चौहान यांच्याकडे सैनिक कल्याण, होमगार्ड, पीआरडी आणि नागरी सुरक्षा मंत्रालयाची जबाबदारी होती. चौहान यापूर्वी दोनवेळा खासदारही झाले होते. कोरोनामुळे आतापर्यंत यूपी सरकारमधील दोन मंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी 2 ऑगस्टला मंत्री कमला रानी वरुण यांचेही कोरोनामुळे निधन झाले.

राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश इंद्रजीत महंती यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मणिपूर सरकारने राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. येथे मागील 24 तासांत 192 रुग्ण आढळले.

देशात ज्या वेगाने नवीन रुग्ण वाढत आहेत त्या प्रमाणात मृत्यूचे प्रमाण वाढत नाही. उदाहरणार्थ, देशात सुरुवातीचे 10 हजार मृत्यू 16 जूनपर्यंत झाले होते, तेव्हा एकूण 3.54 लाख रुग्ण होते. म्हणजेच यापैकी 2.82% रुग्णांचा मृत्यू झाला.

0