आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 17 August 2020 News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:बंगालमध्ये टीएमसी आमदाराचे कोरोनामुळे निधन, मागील 24 तासांत 57 हजार 982 रुग्णांची वाढ; आतापर्यंत 26.49 लाख प्रकरणे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या मालाड भागात तपासणीसाठी जाताना बीएमसीचे आरोग्य कर्मचारी. येथे सातत्याने मोठ्या प्रमाणात तपासणी केल्याने स्थिती सामान्य होत आहे - Divya Marathi
मुंबईच्या मालाड भागात तपासणीसाठी जाताना बीएमसीचे आरोग्य कर्मचारी. येथे सातत्याने मोठ्या प्रमाणात तपासणी केल्याने स्थिती सामान्य होत आहे
  • देशात रविवारी 930 रुग्णांचा मृत्यू, एकूण मृत्यूसंख्या 51 हजार 54 वर पोहचली

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार समरेश दास यांचे सोमवारी कोरोनामुळे निधन झाले. 77 वर्षीय समरेश दास पूर्व मिदनापूरच्या एगरा मतदारसंघातील आमदार होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. दुसरीकडे महाराष्ट्रात एनसीपी प्रमुख शरद पवारांच्या निवासस्थानी तैनात दोन सुरक्षा अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाख 49 हजार 046 झाली आहे. मागील 24 तासांत 58 हजार 108 नवीन रुग्णांची नोंद झाली. आठवड्यात दुसऱ्यांदा संक्रमितांची वाढणारी गती कमी झाली आहे. तसेच देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 19 लाख पार झाला आहे.

जवळपास 3 कोटी कोरोना चाचण्या झाल्या, पॉझिटिव्हिटीच रेटमध्ये घसरण

दुसरीकडे देशात कोरोना चाचण्यांची संख्या वाढली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 16 ऑगस्टपर्यंत 3 कोटींपेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या. मागील चार दिवसांत पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घसरण झाली आहे. 12 ऑगस्ट रोजी हा रेट 8.93% होता, तो आता कमी होऊन 16 ऑगस्ट रोजी 8.84% राहिला.

कोरोना अपडेट्स

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी आपली आकडेवारी जारी केली. यानुसार, मागील 24 तासांत 57 हजार 982 रुग्ण वाढले. तर 941 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील संक्रमितांची संख्या 26 लाख 47 हजार 664 झाली आहे. यापैकी 6 लाख 76 हजार 900 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 19 हजार 843 रुग्ण बरे झाले आहेत. तर देशात कोरोनामुळे आतापर्यंत 50 हजार 921 लोकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...