आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 17 November 2020 News And LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:12 राज्यांतील रिकव्हरी रेट 95% पेक्षा जास्त, आतापर्यंत 88.74 लाख संक्रमितांपैकी 82.88 लाख लोक कोरोनामुक्त

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगात भारताचा कोरोनामुक्तीचा दर 93% पार

देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा वेग निरंतर वाढत आहे. 12 राज्यांमध्ये कोरोनामुक्तीचा दर 95% पेक्षा जास्त आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 88 लाख 74 हजार 172 झाली आहे. यातील 82 लाख 88 हजार 169 रुग्ण बरे झाले आहेत. मागील 24 तासांत 28 हजार 377 नवीन रुग्णांची नोंद झाली. मागील 4 महिन्यांत हा आकडा सर्वात कमी आहे. याआधी 14 जुलै रोजी सर्वात कमी 29 हजार 917 रुग्ण आढळले होते.

अॅक्टीव्ह रुग्णांत देखील पुन्हा एकदा तीव्र घट सुरू झाली आहे. मागील 2 दिवसांत अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 25 हजार 944 ने घटली आहे. सध्या देशात 4 लाख 53 हजार 449 रुग्णांवर उपचार सुरू आहे. या प्रकरणात, भारत एक क्रमांकाने खाली घसरून 5 व्या स्थानावर आला आहे. सर्वाधिक अॅक्टीव्ह रुग्णांच्या बाबतीत बेल्जियम चौथ्या क्रमांकावर आला आहे.

जगात भारताचा कोरोनामुक्तीचा दर 93% पार

देशातील सरासरी कोरोनामुक्तीचा दर 93.39% वर गेला आहे. जगातील टॉप-5 संक्रमित देशांत भारताचा रिकव्हरी रेट सर्वाधिक चांगला आहे. अमेरिकेत 60.84%, ब्राझीलमध्ये 90.22%, फ्रान्समध्ये 70.7% आणि रशियात आतापर्यंत 74.60% लोक बरे झाले आहेत.