आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 18 October News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

देशात कोरोना:आज 75 लाख पार होणार आकडा, एकूण 66 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले; मृतांचा आकडा 15 दिवसांनंतर पुन्हा 1 हजार पार; आतापर्यंत 74.92 लाख संक्रमित

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी 61 हजार 893 रुग्ण आढळले, 72 हजार 583 रुग्ण बरे झाले आणि 1031 जणांचा मृत्यू झाला
  • आतापर्यंत 65.94 लाख रुग्ण कोरोनामुक्त, एकूण 1.14 लाख मृत्यू, 7.83 लाख रुग्णांवर उपचार सुरू

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 74.92 लाख झाली आहे. आज हा आकडा 75 लाख पार होईल. देशात आतापर्यंत 65.94 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1.14 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 1031 रुग्णांचा मृत्यू झाला. 2 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदा एका दिवसात मृतांचा आकडा 1000 पार गेला.

दिलासादायक बाब म्हणजे अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 8 लाखांपेक्षा कमी होऊन 7.83 लाख झाली आहे. ही संख्या मागील महिन्यात 16 सप्टेंबर रोजी 10.17 लाखच्या पीकवर पोहोचली होती. शनिवारी 61 हजार 893 रुग्ण आढळले, तर 72 हजार 583 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

संपूर्ण जगात लस पोहोचण्याचे प्रयत्न करावे लागतील - पीएम मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोरोना व्हायरसची स्थिती आणि लस वितरण तयारी बाबत आढावा बैठक घेतली. ते म्हणाले की, "सध्या बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान, मालदीव, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंका सारख्या देशांसोबत व्हॅक्सिनच्या ट्रायलसाठी करार झाले आहेत. मात्र, आपण यापुरते मर्यादित नसावे. प्रत्येकाला असा प्रयत्न करावा लागेल की संपूर्ण जगाला या लसीचा फायदा होऊ शकेल."