आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 18 September 2020 News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:अॅक्टीव्ह रुग्णसंख्या 10 लाखांहून अधिक, तरी दिलासा हा की 50% रुग्णच रुग्णालयात... म्हणजेच देशात 12 लाखांहून अधिक कोविड खाटा रिक्त

पवन कुमार | नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीत 18.8% तर झारखंडमध्ये 98.9% रुग्ण रुग्णालयात दाखल

देशात सतत वाढत चाललेल्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात सक्रिय रुग्णांपैकी फक्त ५०% रुग्णांनाच रुग्णालय, कोविड हेल्थ सेंटर किंवा कोविड केअर सेंटरमध्ये भरती करावे लागत आहे. आरोग्य मंत्रालय व आयसीएमआरने नव्या होम आयसोलेशन धोरणानुसार लक्षणे नसलेल्या किंवा कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार दिले जात आहेत. या स्थितीत भलेही देशात सक्रिय रुग्णांची संख्या ११ लाखांच्या जवळ गेली असली तरी रुग्णालयांत सध्या सुमारे साडेपाच लाखच रुग्ण दाखल आहेत. याचा अर्थ असा की, आरोग्य सुविधा आणि साधनांचा तुटवडा असलेला देश म्हणून अनेकदा चर्चेत असलेल्या भारतात सध्या कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या एकूण खाटांपैकी १२.७० लाख खाटा रिक्त आहेत.

दिल्लीत १८.८% तर झारखंडमध्ये ९८.९% रुग्ण रुग्णालयात दाखल

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ११ सप्टेंबरला देशात ४ लाख ७६ हजार ४१७ कोरोना रुग्ण विविध राज्यांत रुग्णालयांत दाखल होते. या दिवशी देशात सक्रिय रुग्णांची संख्या ९ लाख ५७ हजार ७९५ होती. ११ सप्टेंबरला सर्वाधिक १ लाख १४ हजार ९८४ कोरोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रात रुग्णालयांत दाखल होते. तर, झारखंडमध्ये सुमारे ९९ टक्के रुग्ण रुग्णालयात किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होते.

एकूण सक्रिय रुग्णांत २.१२% आयसीयूमध्ये

९ ते १० सप्टेंबरदरम्यान देशात सक्रिय रुग्णांपैकी २.१२% रुग्ण आयसीयूमध्ये दाखल, ०.३८% व्हेंटिलेटरवर आहेत तर ३.६४% रुग्ण ऑक्सिजन प्रणाली उपलब्ध असलेल्या खाटांवर भरती होते. मात्र, दिल्लीत शेकडो रुग्ण घरीच उपचार घेत असले तरी त्यांना घरी ऑक्सिजन उपलब्ध करून दिला जात आहे.